Yashasvi Jaiswal’s revelation about flying kiss : यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताकडून शतक झळकावले. विशाखापट्टणममध्ये पहिल्या डावात त्याने २०९ धावा केल्या होत्या. या द्विशतकानंतर यशस्वीने मैदानावर मजेशीर पद्धतीने सेलिब्रेशन केले. त्याने दोन्ही हातांचे चुंबन घेऊन त्याने आनंद व्यक्त केला. या सामन्यानंतर यशस्वीने आपल्या खेळीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याने द्विशतकानंतर कोणाला ‘फ्लाइंग किस’ दिला, याबद्दल खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी सकाळी एक व्हिडीओ शेअर केला आहे. सुरुवातीला जैस्वाल फोटोशूट करताना दिसत आहेत. यादरम्यान तो मैदानावर केलेल्या कृतीची पुनरावृत्ती करताना दिसत आहे. द्विशतकावरही त्याने प्रतिक्रिया दिली. यशस्वी म्हणाला, “मी प्रत्येक चेंडूचा आनंद लुटला. हे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे फारसे शब्द नाहीत. मी या खेळीचा आनंद लुटला आणि माझ्या चाहत्यांसाठी ‘फ्लाइंग किस’ दिला.”

सचिन तेंडुलकरचे मानले आभार –

भारताचा अनुभवी खेळाडू सचिन तेंडुलकरने यशस्वी जैस्वालच्या या शानदार खेळीचे कौतुक केले होते. आता यशस्वी जैस्वालने सचिन तेंडुलकरचे आभार मानले. तो म्हणाला, “सर तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी नेहमी प्रयत्न करत राहीन आणि शिकत राहीन.”
उल्लेखनीय आहे की, विशाखापट्टणम कसोटीत प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ३९६ धावा केल्या होत्या. भारताच्या पहिल्या डावात यशस्वीने २९० चेंडूंचा सामना करत २०९ धावा केल्या. त्याच्या खेळीत १९ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. यशस्वी व्यतिरिक्त कोणताही खेळाडू विशेष काही करू शकला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After his double century against england bcci shared a video of yashasvi jaiswal revealing about the flying kiss vbm
First published on: 04-02-2024 at 12:06 IST