अतिशय सामान्य कुटुंबातून येऊन आज देशभरात स्वतःचे नाव गाजविणारा भारताचा फलंदाज यशस्वी जैस्वालनं मुंबईत आपल्या हक्काचं घर घेतलं आहे. एकेकाळी मुंबईत तंबूत गुजराण करणाऱ्या यशस्वी जैस्वाल आणि त्याच्या कुटुंबियांसाठी हा नक्कीच अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. अतिशय खडतर परिस्थितीतून येऊन आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या यशस्वीने वांद्रे पूर्व येथील बीकेसी प्रोजेक्टमध्ये एक आलीशान घर घेतले आहे. या घराची किंमत ५.३८ कोटी असल्याचे सांगितले जाते. सध्या निर्माणाधीन असलेल्या या प्रकल्पातील घराचे क्षेत्रफळ १,११० स्वे. फूट असल्याचे झॅपकी या बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या संकेतस्थळाने निदर्शनास आणून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनीकंट्रोलने दिलेल्या बातमीनुसार, बीकेसी प्रोजेक्टची निर्माती कंपनी अदाणी रिॲलीटी ने मात्र या व्यवहाराबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. बीकेसी प्रोजेक्टला थोडी वादाची पार्श्वभूमी आहे. त्याचे मूळ प्रवर्तक असेलल्या रेडीयस इस्टेटची दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतर अदाणी रिॲलीटीने प्रकल्पाचे काम हाती घेतले. वांद्रे कुर्ला संकुलातील या घराच्या प्रति स्क्वे. फूटासाठी यशस्वी जैस्वालने तब्बल ४८,००० रुपये मोजले आहेत. या वर्षीच्या अखेरीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याचे संकेत दिले जात आहेत.

IND vs ENG 3rd Test : यशस्वी जैस्वाल ‘दादा’वरही पडला भारी! गांगुलीचा मोडला १७ वर्षांपूर्वीचा विक्रम

आयपीएलमध्ये लागली कोट्यवधींची बोली

१९ वर्षांखालील संघात धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर २०२० साली राजस्थान रॉयल्सने तब्बल २.४ कोटी खर्च करून यशस्वी जैस्वालला संघात घेतले होते. २०२२ साली राजस्थानने चार कोटी रुपये मोजून त्याला संघात कायम ठेवले. २०२३ च्या आयपीएल हंगामात यशस्वी जैस्वालने अवघ्या १३ चेडूंत तडाखेबाज फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. ही कामगिरी करताना त्याने केएल राहूल आणि पॅट कमिन्स यांचा विक्रम मोडीत काढला.

प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, शेवटच्या कॉलमुळे IPL मधला प्रसिद्ध खेळाडू अडचणीत

जैस्वालची एकूण मिळकत किती?

डीएनएने दिलेल्या बातमीनुसार, जैस्वालची एकूण संपत्ती १०.७३ कोटी असल्याचे सांगितले जाते. आयपीएल वगळता भारताचा हा तरुण क्रिकेटपटू महिन्याकाठी ३५ लाखांची कमाई करतो. तसेच भारतीय संघासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यांसाठी बीसीसीआयकडूनही उत्पन्न मिळते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer yashasvi jaiswal buy five crore flats in mumbai kvg
First published on: 21-02-2024 at 15:53 IST