Which players can KKR retain before IPL 2025 Mega Auction : आयपीएल २०२४ च्या फायनल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत तिसऱ्यांदा चमकदार ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाताने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात हैदराबादचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवत १० वर्षांपासूनचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. आता पुढील हंगाम म्हणजेच आयपीएल २०२४ पूर्वी मोठा लिलाव होणार आहे. अशा परिस्थितीत चॅम्पियन केकेआर कोणते चार खेळाडू रिटेन करणार? हा मोठा प्रश्न असेल.

कोलकाता नाईट रायडर्सकडे अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. पण आयपीएलच्या नियमानुसार संघ फक्त चारच खेळाडूंना रिटेन करु शकतो. अशा परिस्थितीत, मोठ्या लिलावापूर्वी कोलकात नाईट रायडर्सं कोणत्या चार खेळाडूंवर विश्वास दाखवून रिटेन करु शकतो, हे जाणून घेऊया.

१- श्रेयस अय्यर

केकेआरच्या रिटेन करण्याच्या यादीत पहिले नाव कर्णधार श्रेयस अय्यरचे असू शकते. अय्यरने संघाला आयपीएल २०२४ चा चॅम्पियन बनवला, अशा परिस्थितीत त्याला रिटेन करणे जवळपास निश्चित होईल. आयपीएल २०२४ मध्ये केकेआरची धुरा चोखपणे सांभाळली आहे. अय्यर २०२२ पासून कोलकात्याची जबाबदारी सांभाळत आहेत. दरम्यान, २०२३ मध्ये दुखापतीमुळे, तो स्पर्धेचा भाग होऊ शकला नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत नितीश राणाने कोलकाताचे नेतृत्व केले.

हेही वाचा – Team India : अभिषेक-रियानसह ‘हे’ पाच खेळाडू लवकरच भारतासाठी खेळताना दिसणार, पाहा कोणत्या दौऱ्यात मिळणार संधी?

२- सुनील नरेन

कोलकात्याच्या रिटेन करण्याच्या यादीत दुसरे नाव स्टार अष्टपैलू सुनील नरेनचे असू शकते. नरेनने आयपीएल २०२४ मध्ये बॉल आणि बॅटने संघासाठी चांगली कामगिरी केली. नरेनला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सीझनचा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवडण्यात आले. १४ सामन्यांच्या १४ डावांमध्ये फलंदाजी करताना नरेनने ३४.८६ च्या सरासरीने आणि १८०.७४ च्या स्ट्राइक रेटने ४८८ धावा केल्या आङेत. या काळात त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली. याशिवाय गोलंदाजी करताना २१.६५ च्या सरासरीने १७ बळी घेतले.

३- रिंकू सिंग

रिंकू सिंग दीर्घकाळापासून कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. रिंकूला २०१८ मध्ये केकेआर संघाचा भाग राहिला आहे. या वर्षी रिंकू बॅटने फारसा प्रभावित करू शकला नसला तरी गेल्या हंगामात म्हणजेच आयपीएल २०२३ मध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. रिंकू कोलकात्याच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. अशा परिस्थितीत २०२५ मध्ये होणाऱ्या मोठ्या लिलावापूर्वी संघ रिंकूला रिटेन करु शकतो.

हेही वाचा – KKR vs SRH : सचिन तेंडुलकरने केकेआर संघाच्या विजेतेपदाचे श्रेय कोणाला दिले? म्हणाला, “त्यांच्या…”

४- आंद्रे रसेल

आंद्रे रसेल २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाला होता. रसेल केकेआरचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. या हंगामातही त्याने अप्रतिम कामगिरी केली. आयपीएल २०२४ मध्ये फलंदाजी करताना रसेलने ३७.७१ च्या सरासरीने आणि १८५ च्या स्ट्राइक रेटने २२२ धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीत त्याने १५.५३ च्या उत्कृष्ट सरासरीने १९ विकेट्स घेतल्या.