आयपीएलमधील पंजाब किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचा महत्त्वाचा खेळाडू कगिसो रबाडा हा मायदेशी परतला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ तोंडावर असताना त्याची दुखापत दक्षिण आफ्रिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने बुधवारी सांगितले की पंजाब किंग्जचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा सॉफ्ट दुखापतीमुळे मायदेशी परतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने असेही म्हटले आहे की वेगवान गोलंदाजावर त्याच्या वैद्यकीय पथकाने बारकाईने लक्ष ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेला आशा आहे की दुखापतीमुळे पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीवर परिणाम होणार नाही. धरमशाला येथे आरसीबीविरुद्धचा सामना गमावण्यापूर्वी रबाडा पीबीकेएसकडून हंगामातील प्रत्येक सामन्यात खेळला. त्याने ११ सामन्यात फ्रँचायझीसाठी ११ विकेट घेतले. टी-२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेने आधीच संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये रबाडाचा समावेश आहे. पण सध्या आफ्रिका क्रिकेट बोर्डाला संघ निवडीवरून टिकेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वर्ल्डकपपेक्षाही संघाला कोटा सिस्टिमची अधिक चिंता भेडसावत आहे.

हेही वाचा- भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा, भावुक करणारा व्हीडिओ पोस्ट करत दिली माहिती

रबाडाने टी-२- वर्ल्डकपमध्ये खेळणं दक्षिण आफ्रिकेसाठी अधिक महत्त्वाचे आहे. कारण १५ जणांच्या विश्वचषक संघात तो एकमेव कृष्णवर्णीय आफ्रिकन खेळाडू आहे, जो वादाचे कारण बनला आहे. आफ्रिका क्रिकेट मंडळाला या मुद्द्यावरून मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या ‘परिवर्तनशील धोरणा’नुसार, संपूर्ण हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम ११ खेळाडूंत केवळ पाच गौरवर्णीय असू शकतात. सहा खेळाडू अन्य वंशाचे, त्यातही दोन खेळाडू आफ्रिकन कृष्णवर्णीय असणे आवश्यक असते. मात्र, विश्वचषकासाठीच्या संघात केवळ रबाडा हा एकमेव आफ्रिकन कृष्णवर्णीय खेळाडू आहे. सध्या सुरू असलेल्या या टीकेवरून रबाडाने एकंदरीत वर्ल्डकपचे सर्व सामने खेळणे आफ्रिका क्रिकेट बोर्डासाठी अधित महत्त्वाचे ठरले आहे. दक्षिण आफ्रिकेला 2024-25 हंगामात सरासरी वाढवण्याची संधी असेल.

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात नऊ गौरवर्णीय आणि सहा अन्य वंशाचे खेळाडू आहेत. या सहा जणांत कगिसो रबाडा, रीझा हेंड्रिक्स, बोर्न फोर्टेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी आणि ऑटनिल बार्टमन यांचा समावेश आहे. मात्र, यापैकी रबाडा हा एकमेव आफ्रिकन वंशाचा कृष्णवर्णीय खेळाडू आहे. तर लुंगी एनगिडी हा एकमेव कृष्णवर्णीय आफ्रिकन खेळाडू आहे. पण त्याला राखीव म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे इतर वेगवान गोलंदाज ॲनरिक नॉर्किया आहेत, जो फ्रॅक्चरमुळे नऊ महिन्यांच्या विश्रांतीनंतर परतला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kagiso rabada injury is biggest tension for south africa cricket board know the reason as they are criticising for t20 world cup squad selection with onlu one black player bdg