IND vs AUS Andrew McDonald statement on Mohammed Shami : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत भारताला मोहम्मद शमीची खूप उणीव भासेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी व्यक्त केला आहे. पण अनुभवी वेगवान गोलंदाजाची जागा घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांना आपला संघ कमी लेखणार नाही, असे ते म्हणाले. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या विजयात शमीने महत्त्वाची भूमिका होती. घोट्याच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलनंतर तो खेळलेला नाही.

मोहम्मद शमी पायाच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. अलीकडेच त्याच्या गुडघ्याला सूज आली होती. ज्यामुळे त्याच्या पूर्ण तंदुरुस्तीच्या प्रक्रियेवर परिणाम झाला होता. भारताने प्रथमच दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि आंध्रचा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांना संधी दिली आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि प्रसिद्ध कृष्णा यांचीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल.

अँड्र्यू मॅकडोनाल्ड काय म्हणाले?

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार मॅकडोनाल्ड म्हणाले, ‘मोहम्मद शमीची अनुपस्थिती भारतासाठी मोठा धक्का आहे. आमचे फलंदाज ज्या पद्धतीने त्याची लाईन आणि लेन्थ आणि त्याच्या कामाबद्दलचे समर्पण याबद्दल बोलतात, यावरुन मला वाटते भारताला त्याची उणीव नक्कीच भासेल. पण मागच्या वेळी काय झाले ते आम्हाला माहीत आहे. त्यांच्या राखीव खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती आणि भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंना अजिबात कमी लेखता येणार नाही.’

हेही वाचा – Mohammad Amir : “आपकी हरकतें…”, रमीझ राजाने शान मसूदला अपमानित करण्याचा प्रयत्न केल्याने मोहम्मद आमिर संतापला, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आम्ही आमचा सर्वोत्कृष्ट संघ निवडू’ –

देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारा युवा फलंदाज सॅम कोन्स्टासची ऑस्ट्रेलिया संघात निवड होऊ शकते. तो उस्मान ख्वाजासह डावाची सलामी देण्याच्या शर्यतीत आहे. मॅकडोनाल्ड म्हणाले, ‘आम्ही आमचा सर्वोत्कृष्ट संघ निवडू आणि त्यामध्ये कोणत्याही युवा खेळाडूचा समावेश करावा लागला, तर आम्ही त्या दिशेने वाटचाल करू. निवडसमितीला सॅम कोन्स्टास सर्वोत्तम पर्याय वाटत असेल तर आम्ही त्याला संधी देऊ.’