India vs Australia, U19 World Cup Final : एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या (युवा विश्वचषक) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभा केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने फायनलमध्ये २५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. दक्षिण आफ्रिकेतील सहारा पार्क मैदानातील खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे या मैदानावर २५३ ही खूप मोठी धावसंख्या मानली जात होती. त्यामुळे भारतासमोरच्या अडचणी वाढल्या. विश्वचषक उंचावण्यासाठी कर्णधार उदय सहारनच्या संघाला निर्धारित ५० षटकांमध्ये २५४ धावांची आवश्यकता होती. परंतु, भारतीय संघ निर्धारित ४३.५ षटकांत १७४ धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणाणी भारतालाया सामन्यात ७९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.

भारताच्या वरिष्ठ संघाप्रमाणेच युवा संघाचंदेखील विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली होती. अशीच काहीशी अवस्था भारताच्या युवा संघाचीदेखील झाली आहे. यंदाच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याने ऑस्ट्रेलिया भारताचा ७९ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार ह्यू वैबगेन नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिला डावात फलंदाजी करताना कांगारुंच्या संघाने निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावा करत भारतासमोर २५४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. भारत निर्धारित ५० षटकंदेखील खेळू शकला नाही. भारतीय संघांला ४३.५ षटकांत १७४ धावांपर्यंत मजल मारता आहे. सलामीवीर आदर्श सिंह (४७) आणि खालच्या फळीत मुरुगन अभिषेक ४२ या दोघांनी थोडीफार झुंज दिली. परंतु, हे दोघे या सामन्यात भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

Live Updates

India U-19 vs Australia U-19 ICC World Cup 2024 Final in Marathi

21:00 (IST) 11 Feb 2024
भारताचा १० वा फलंदाज बाद

टॉम स्ट्रॅकरने ४४ व्या षटकात सौमी कुमार पांडे (२) याला यष्टीरक्षक रायन हिक्सकरवी झेलबाद केलं.

20:45 (IST) 11 Feb 2024
१६८ धावांवर भारताचा ९ वा गडी माघारी, मुरुगन अभिषेकची झुंज अपयशी

आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मुरूगन अभिषेकने काही काळ फटकेबाजी करत प्रतिकार केला. परंतु त्याची झुंज अपयशी ठरली आहे. कॉलम विडलरने ४१ व्या षटकात अभिषेकला ह्यू वैबगेनकरवी झेलबाद केलं. अभिषेकने ४६ चेंडूत ४२ धावांची खेळी केली.

20:19 (IST) 11 Feb 2024
आदर्श सिंह ४७ धावांवर बाद

आदर्श सिंहची चाचपडत सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ३१ व्या षटकांत महील बीअर्डमनने आदर्शला यष्टीरक्षक रायन हिक्सकरवी झेलबाद केलं. आदर्शने ७७ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावांची खेळी साकारली.

भारत ७ बाद ११५

19:49 (IST) 11 Feb 2024
मोठ्या संघर्षानंतर भारताचं शतक

२७.५ षटकात भारताने ६ बाद १०० धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडून सलामीवीर आदर्श सिंह ३५ धावांवर नाबाद आहे. त्याच्या जोडीला मुरूगन अभिषेक (७) मैदानात उभा आहे.

19:44 (IST) 11 Feb 2024
९१ धावांवर भारताचा सहावा फलंदाज माघारी, अरवली राव शून्यावर बाद

राफेल मॅकमिलन याने अरवली राव याला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

19:37 (IST) 11 Feb 2024
९० धावांवर भारताचा निम्मा संघ माघारी, प्रियांशू मोलिया ९ धावांवर बाद

सचिन धसपाठोपाठ प्रियांशू मोलियादेखील ९ धावांवर बाद झाला आहे. त्याला चार्ली अँडरसनने कॉलम विडलरकरवी झेलबाद केलं.

19:20 (IST) 11 Feb 2024
भारताला चौथा धक्का, सचिन धस ९ धावांवर बाद, भारत ४ बाद ६८

ऑस्ट्रेलियाने भारताला आणखी एक धक्का दिला आहे. राफेल मॅकमिलन याला यष्टीरक्षक रायन हिक्सकरवी झेलबाद केलं.

19:07 (IST) 11 Feb 2024
भारताला मोठा धक्का, कर्णधार उदय सहारन ८ धावांवर बाद, भारत ३ बाद ५५

महील बीअर्डमनने भारताचा कर्णधार उदय सहारनला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यू वैबगेनकरवी झेलबाद केलं आहे. उदयने केवळ आठ धावांचं योगदान दिलं.

१७ षटकांनंतर भारताच्या ३ बाद ५६ धावा

18:40 (IST) 11 Feb 2024
४० धावांवर भारताला दुसरा धक्का, मुशीर खान त्रिफळाचित

भारतीय संघाची धिमी सुरुवात झाल्यानंतर धावफलकावर अर्धशतक पूर्ण होण्याआधीच भारताला दुसरा धक्का बसला आहे. महील बीअर्डमनने मुशीर खान याला त्रिफळाचित केलं. मुशीरने ३३ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने २२ धावा जमवल्या.

भारत ४०/२ (१३.२ षटकं)

17:54 (IST) 11 Feb 2024
भारताला मोठा धक्का, तिसऱ्याच षटकात सलामीवीर अर्शीन कुलकर्णी बाद

भारताच्या डावातील तिसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला मोठं यश मिळालं आहे. जलदगती गोलंदाज कॉलम वायडर याने भारताचा सलामीवीर अर्शीन कुलकर्णी याला अवघ्या तीन धावांवर असताना यष्टीरक्षक रायन हिक्सकरवी झेलबाद केलं.

भारत ३/१

17:15 (IST) 11 Feb 2024
ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर २५३ धावांचा डोंगर, स्पर्धेच्या फायनलमधील इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या

ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे. १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने फायनलमध्ये २५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. दक्षिण आफ्रिकेतील सहारा पार्क मैदानातील खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. या मैदानावर २५३ ही खूप मोठी धावसंख्या आहे. त्यामुळे भारतासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात हरजस सिंह याने सर्वाधिक ५५ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर कर्णधार ह्यू वेबगन (४८), ऑली पीक नाबाद ४६, सलामीवीर हॅरी डिक्सन याने ४२ धावांची खेळी साकारत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. गोलंदाजीत भारताकडून राज लिंबानी याने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर नमन तिवारीने दोन कांगारूंना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. सौमी कुमार पांडे आणि मुशीर खान या दोघांनी प्रत्येकी एकेक बळी टीपला.

16:50 (IST) 11 Feb 2024
ऑस्ट्रेलियाचा ७ वा फलंदाज माघारी, राज लिंबानीकडून तिसरी शिकारी, चार्ली अँडरसन १३ धावांवर बाद

जलदगती गोलंदाज राज लिंबनी याने तिसरा बळी घेतला आहे. त्याने चार्ली अँडरसनला १३ धावांवर असताना पायचित बाद केलं.

ऑस्ट्रेलिया २२३/७ (४६ षटकं)

16:20 (IST) 11 Feb 2024
ऑस्ट्रेलियाचा सहावा फलंदाज माघारी, राफेल मॅकमिलन दोन धावांवर बाद

मुशीर खान याने भारताला सहावं यश मिळवून दिलं आहे. त्याने आक्रमक फलंदाज राफेल मॅकमिलन याला अवघ्या दोन धावांवर असताना स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपत पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

ऑस्ट्रेलिया १८७/६ (४० षटकं)

16:10 (IST) 11 Feb 2024
भारताला मोठं यश, आक्रमक फलंदाज हरजस सिंह ५५ धावांवर बाद, ऑस्ट्रेलिया ५ बाद १८१

भारतीय संघाला पाचवं यश मिळालं आहे. कुमार पांडे याने ३८ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अर्धशतकवीर हरजस सिंह याला पायचित पकडलं. हरजसने ६५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५५ धावा फटकावल्या.

16:02 (IST) 11 Feb 2024
ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, रायन हिक्स २० धावांवर बाद, राज लिंबानीला दुसरं यश

३५ व्या षटकात राज लिंबानी याने यष्टीरक्षक फलंदाज रायन हिक्सला पायचित पकडलं. रायन २० धावा करून बाद झाला.

ऑस्ट्रेलिया – १७१/४ (३६ षटकं)

15:10 (IST) 11 Feb 2024
ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, सलामीवीर डिक्सन ४२ धावा करून बाद, नमन तिवारीची दुसरी शिकार

ऑस्ट्रेलियन संघाला तिसरा धक्का बसला आहे. फिरकीपटू नमन तिवारी याने सलामीवीर हॅरी डिक्सन याला ४२ धावांवर बाद केलं. मुरुगन अभिषेकने उत्कृष्ट झेल टिपत डिक्सनला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

ऑस्ट्रेलिया – १०६/३ (२४ षटकं)

14:57 (IST) 11 Feb 2024
ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, कर्णधार ह्यू वेबगन ४८ धावांवर बाद

फिरकीपटू नमन तिवारीने भारतीय संघाला दुसरं यश मिळवून दिलं आहे. नमनने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यू वेबगनला ४८ धावांवर बाद केलं. ह्यू मुशीर खानकडे झेल देत माघारी परतला. २१ षटकानंतर ऑस्ट्रेलियाने २ बाद ९४ धावांपर्यंत मजल मारली आहे.

14:37 (IST) 11 Feb 2024
हॅरी डिक्सन आणि ह्यू वेबगनची अर्धशतकी भागीदारी

१६ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत हॅरी डिक्सन आणि ह्यू वेबगनने अर्धशतकी भगीदारी पूर्ण केली. १६ षटकाअखेर धावफलकावर ऑस्ट्रेलियाच्या ६६ धावा लागल्या आहेत. डिक्सन २८ आणि ह्यू ३१ धावांवर खेळत आहेत.

14:35 (IST) 11 Feb 2024
ऑस्ट्रेलियाचं अर्धशतक

१३ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ह्यू वेबगनने मुशीर खानला चौकार लगावत धावफलकावर ऑस्ट्रेलियाचं अर्धशतक झळकावलं.

13:49 (IST) 11 Feb 2024
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का; राज लिंबानीने घेतला पहिला बळी

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिसऱ्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे. राज लिंबानीने सॅम कोन्स्टासला शून्यावर बाद करून ऑस्ट्रेलियाला खिंडार पाडले. सॅमने आठ चेंडू खेळून एकही धाव केली नाही. सॅम बाद झाल्यानंतर कर्णधार ह्यू वेबगन खेळायला उतरला आहे.

13:44 (IST) 11 Feb 2024
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यू वेबगन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे आयसीसी अंडर १९ विश्वचषकाचा अंतिम सामना आज खेळला जात आहे.

10:48 (IST) 11 Feb 2024
IND vs AUS U19 WC Final 2024: भारत वि. ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना कधी, कुठे पाहाल? कसा असेल संघ?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या आयसीसी विश्वचषकच्या अंतिम सामन्यात भारताचा मागील वर्षी झालेला पराभव अजूनही लक्षात असताना आज अंडर १९ चा संघ त्या पराभवाचा बदला घेऊ शकेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. India vs Australia, U19 Cricket World Cup Final: लाईव्ह स्ट्रीमिंगचे तपशील इथे पाहा.

10:39 (IST) 11 Feb 2024
उदय सहारनच्या कामगिरीकडे लक्ष

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व उदय सहारनकडे आहे. उदयने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांत ६४.८३च्या सरासरीने ३८९ धावा केल्या आहेत.

अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप फायनल भारत वि ऑस्ट्रेलिया लाइव्ह