Premium

Hair Tips : केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी ‘या’ सर्वात प्रभावी घरगुती उपायांचा एकदा नक्की वापर करून पाहा

हिवाळ्यात केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते. केसांतील कोंड्यामुळे टाळूला खाज येते. त्यामुळे केसही कोरडे आणि निर्जीव होतात. जर तुम्हीही केसांमधील कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर काही सोपे घरगुती उपाय एकदा नक्की वापरून पाहा.

dandruff
(File Photo)

हिवाळ्यात केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते. केसांतील कोंड्यामुळे टाळूला खाज येते. त्यामुळे केसही कोरडे आणि निर्जीव होतात. जर तुम्हीही केसांमधील कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर काही सोपे घरगुती उपाय एकदा नक्की वापरून पाहा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिंबू
लिंबू हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी लिंबू सर्वात प्रभावी ठरेल. तेलात लिंबू मिसळून केसांच्या मुळांना लावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होईल.

आणखी वाचा : Health Tips : पोटातून येणारा गुडगुड आवाज गंभीर आजारांचं लक्षण ठरू शकतं! ‘हे’ पदार्थ खाणं ताबडतोब सुरू करा

मेथी
मेथीच्या दाण्यांची पावडर बनवा आणि या पावडरमध्ये दही मिसळा. रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी केसांना लावा आणि तासभर असेच ठेवा. काही वेळाने केस सौम्य शाम्पूने धुवा. यामुळे कोंडा दूर होण्यास मदत होईल.

आणखी वाचा : Hair Care Tips : हिवाळ्यात केस गळणे लगेच कमी होईल, हे सोपे घरगुती उपाय नक्की वापरून पाहा

ताक
ताक वापरल्याने कोंड्याच्या समस्येतही आराम मिळेल. ताकाने केस धुतल्याने कोंड्याची समस्या दूर होईल.

(टिप: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. आम्ही याची पुष्टी करत नाही.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Best home remdies for dandruff hair fall problem prp

First published on: 25-01-2022 at 21:58 IST
Next Story
Republic Day 2022 Live Streaming : घरबसल्याही पाहू शकता प्रजासत्ताक दिनाची परेड, कशी आणि कुठे? जाणून घ्या