जर घरामध्ये एका ठिकाणी झुरळ दिसले तर त्यांना मारणे महत्वाचे आहे, अन्यथा झुरळ तुमच्या घरामध्ये पसरू शकतात. वास्तविक, झुरळ बहुतेकदा अस्वच्छता असलेल्या आणि खाद्यपदार्थां असलेल्या ठिकाणी फिरतात. यानंतर ते सर्वत्र पसरू लागतात आणि नंतर घराचा प्रत्येक कोपरा व्यापतात. अशा वेळी काही घरगुती उपाय करून पाहिल्यास या झुरळांपासून सुटका होऊ शकते. विशेष म्हणजे या टिप्स स्वतः मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी दिल्या आहेत, ज्या झुरळांना मारण्यासाठी प्रभावी आहेत. तसेच, या घरगुती उपायासाठी तुम्हाला जास्त खरेदी करण्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया झुरळ मारण्याचे घरगुती उपाय.

या २ घरगुती उपायाच्या मदतीने तुमच्या घरातून झुरळे पळवून लावू शकता

बोरॅक्स पावडर आणि साखरेचा वापर
तुम्हाला फक्त बोरॅक्स पावडर घ्यायची आहे, साखर बारीक करून मिक्स करायची आहे. आता हे दारे आणि खिडक्यांच्या कोपऱ्यात टाका. ज्या ठिकाणी झुरळ येतात त्या सर्व ठिकाणी ठेवा. हे खरेतर एका प्रकारच्या विषासारखे काम करतात. होतं काय की, झुरळं तर साखर खायला येतातच पण बोरॅक्स पावडरही खातात. यामुळे त्यांचा मृत्यू होतो आणि तुम्ही जास्त प्रयत्न न करता झुरळांपासून मुक्त होतात.

हेही वाचा – “…म्हणून मी पत्नी आणि मुलांच्या ‘अडीच तास’ आधी उठतो”, अक्षय कुमारने सांगितले त्याच्या या खास सवयी मागचे कारण, पाहा

बेकिंग पावडर आणि साखरेचा वापर
बेकिंग पावडर आणि साखरेचा वापर झुरळे मारण्यासाठी उपयुक्त ठरतो. तुम्हाला फक्त साखर बारीक करून त्यात बेकिंग पावडर मिसळायची आहे. यानंतर, ज्या ठिकाणी झुरळ येतात त्या सर्व ठिकाणी ते टाका. हे काम तुम्हाला रात्री करावे लागते कारण झुरळांना रात्री खाण्यासाठी जास्त वेळ मिळतो. अशा प्रकारे बेकिंग पावडर आणि साखरेचा वापर झुरळे मारण्यासाठी प्रभावीपणे काम करू शकतो.

हेही वाचा – Kitchen Jugaad : टिश्यू पेपर, बर्फ वापरून साठवा पुदिना, वर्षभर करू शकता वापर

तर फक्त या २ टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातून झुरळे दूर करू शकता. हे इतके सोपे आणि प्रभावी आहेत की ते नेहमीच उपयुक्त ठरू शकतात. झुरळ कुठेही असले तरी या टिप्सच्या मदतीने तुम्ही त्यांना तुमच्या घरातून नष्ट करू शकता.