अक्षय कुमार एका ठरलेल्या वेळापत्रकासह शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी ओळखला जातो. त्याची शरीरयष्टी पाहता तुम्हाला असे वाटू शकते की, तो सकाळी उठल्या उठल्या जीममध्ये जात असेल, पण हे सत्य नाही. याउलट, तो दिवसाची सुरुवात सावकाशपणे करतो आणि त्याला सकाळी स्वतःबरोबर वेळ घालवणे आवडते.

शिखर धवनच्या ‘धवन करेंगे’ या शोदरम्यान अक्षय कुमार म्हणाला, “मला वाटते की, प्रत्येक व्यक्तीने लवकर उठले पाहिजे, कारण एकटे राहण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. जेव्हा जोडीदार झोपेत असेल किंवा मुले झोपेत असतील, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी २-२.५ तास मिळवू शकता. मी उठतो आणि व्यायाम सुरू करतो असे नाही. मी उठतो, आळस घालवतो, बागेत जातो. माझ्या घराजवळ समुद्र आहे. मी समुद्रकिनारी जातो. मी फेरफटका मारतो. मी स्वतःशी बोलतो.”

पत्नी आणि मुलांच्या आधी उठून स्वत:साठी काढलेल्या या वेळेला महत्त्व देताना अक्षय सांगतो की, “माझ्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. ते दोन तास सर्वोत्तम आहेत. माझ्यासाठी हेच ध्यान आहे, अन्यथा मी ध्यान करत नाही. माझी दिनचर्या म्हणजे माझे ध्यान आहे. स्वत:च्या आत डोकावणे तेच माझ्यासाठी माझे खरे ध्यान आहे.”

सकाळी लवकर उठण्याचे आणि निसर्गाच्या सानिध्यात स्वतःबरोबर वेळ घालवण्याचे सकारात्मक परिणाम समजून घेऊया.

हेही वाचा – गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

सकाळी लवकर उठण्याचे काय फायदे आहेत?
सकाळच्या वेळी स्वतःबरोबर वेळ घालवणे तुमच्या अंतर्मनाशी जोडण्यासाठी महत्त्वाचे आहे. “सकाळी शक्तिशाली सक्रियकरण (powerful activation) होते. तुम्हाला पुढील दिवसासाठी तयार करते आणि तुमचे स्वतःशी नातं तयार करण्यात मदत करते. तुमच्या अंतर्मनाचे ऐकणे तुम्हाला आयुष्यात खूप पुढे जाण्यास मदत करते,” असे स्पार्कलिंग सोलच्या संस्थापक आणि व्यवसाय प्रशिक्षक, अंतर्ज्ञानतज्ज्ञ (intuition expert) आणि श्रद्धा सुब्रमण्यन यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

सुब्रमण्यन यांच्या मते, “जेव्हा सभोवतालीचे जग थोडे शांत असते तेव्हा स्वतःच्या अंतर्मनाशी जोडले जाणे सोपे असते. यामुळेच सकाळचा दिनक्रम गेमचेंजर ठरतो.

हेही वाचा – शाहरुख खानला झाला उष्माघाताचा त्रास; वयाच्या पन्नाशीनंतर निर्जलीकरण कसे टाळावे?

“तुमचे अंतर्ज्ञान आणि तुमचे अंतर्गत मार्गदर्शन हे जगण्याचा सर्वात पवित्र, शक्तिशाली, हेतुपुरस्सर (intentiona) आणि विस्तारित (expanded) मार्ग आहे. हे संपूर्णपणे जगण्यासाठी, स्वतःला जाणून घेण्यासाठी आणि एखाद्याच्या क्षमतेचा वापर करून भरभराट होण्यासाठी कल्पना निर्माण करण्यास मदत करते,” असे सुब्रमण्यन यांनी सांगितले.

“माझ्यासाठी सकाळची स्वतःबरोबरची वेळ ही एक जादुई जग आहे, जी मला माझ्या जगाला सहजतेने, करुणा, निर्मितीशी जोडण्याची अनुमती देते आणि केवळ माझ्याशीच नव्हे तर माझ्या सभोवतालच्या प्रत्येकाशी जोडण्यास अनुमती देते. एक माणूस म्हणून मला अभिव्यक्तीचे सुंदर मार्ग दाखवते, असे सुब्रमण्यन यांनी सांगितले.