Ceiling fan cleaning tips: उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत सिलिंग फॅनची आवश्यकता भासते. पण महिनोंमहिने पंख्याच्या स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यामुळे धुळीचे थर जमा होतात. काहीवेळा छताचे पंखे जास्त काळ चालल्यामुळे खूप घाण होतात आणि पंखा कळकट, जुना झाल्यासारखा दिसतो तर काही वेळा पंखा फिरत असताना आवाजही येतो. घरातील इतर भागांची स्वच्छता करतो त्याचप्रमाणे पंखा स्वच्छ करणंही गरजेचं असतं. वास्तविक छतावरील पंखा साफ करणे हे खूप अवघड काम आहे, त्यामुळे बरेच लोक ते टाळतात. परंतु काळजी करु नका, एका गृहिनीने जबरदस्त असा जुगाड दाखविला आहे. ज्याच्यामदतीने तुम्हाला छतावरील पंखा काही मिनिटांतच साफ करता येईल.

महिलेने पंखा स्वच्छ करण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा भन्नाट असा जुगाड शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक हटके ट्रिक सांगितली आहे. गुडघे, कंबरदुखी, प्रेग्नंसी या कारणांमुळे अनेकांना टेबल किंवा खुर्चीवर चढून पंखा स्वच्छ करणं शक्य होत नाही. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही सहजरित्या पंखा साफ करु शकता. यासाठी महिलेने दाखविलेला हा प्रयोग नक्की करुन पाहा…

(हे ही वाचा : Jugaad Video: उन्हाळ्यात नळातून पाणी गरम येतंय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; कडक उन्हात टाकीतील पाणी राहील थंड )

तुम्हाला नेमकं काय करायचं? 

महिलेने व्हिडिओमध्ये दाखविल्यानुसार, एक काॅटनचा जुना कापड घेतलं आहे. याला दोन भागात कात्रीने कापून घेतलं आहे. त्यानंतर कापडाला गुंडाळून घेतलं आहे. त्यानंतर प्लास्टिकच्या बाटली घेतली आहे. या बाटलीला मध्य भागातून कट केलं आहे. गुंडाळून ठेवलेलं कापड घेऊन महिलेने हा कापड प्लास्टिकच्या बाटलीच्या आत टाकलं आहे. त्यानंतर धागा घेऊन बाटलीचा एक साईड पडकून कापडाला महिलेने बांधल आहे. त्यानंतर दुसरा कापडही बाटलीच्या आत टाकून महिलेने बांधून घेतलं आहे. त्यानंतर बाटलीच्या समोरचा भाग कट करुन महिलेने तो भाग बाटलीच्या मध्यभागी फीट करुन टाकलं आहे. त्यानंतर एक लाकडाची मोठी काठी घेऊन महिलेने मध्यभागी टाकलं आहे आणि हे टूल बनविल्यानंतर याच्या मदतीने पंखा अगदी सहजरित्या स्वच्छ केलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या जुगाडाच्या मदतीने सोप्या पध्दतीने पंखा स्वच्छ करता येईल, असा दावा महिलेने केला आहे.

येथे पाहा व्हिडीओ

Madhuris creative world या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)