इडली आणि राजमा हे भारतातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ आहेत. मुळात राजमा हा उत्तर भारतीय पदार्थ मानला जातो आणि इडली हा दक्षिण भारतीय पदार्थ मानला जातो. परंतु त्यांची चव आणि त्यातील पौष्टिक पोषक घटकांमुळे ते इतर राज्यांमध्ये तितक्या आवडीने खाल्ले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, जैवविविधतेला सर्वाधिक हानी पोहोचवणाऱ्या टॉप २५ खाद्यपदार्थांमध्ये या पदार्थांचा समावेश झाला आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण भारतातील इटली, चणा मसाला, राजमासह चिकन जालफ्रेझी पदार्थांचा जैवविविधतेला सर्वाधिक हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांमध्ये समावेश झाला आहे.

PLOS ONE या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात जगभरातील १५१ लोकप्रिय पदार्थ्यांचे विश्लेषण करण्यात आले, यानंतर शास्त्रज्ञांनी जैवविविधतेला हानी पोहचवणाऱ्या जगभरातील पदार्थांची नावे जाहीर केली. यात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांचा समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या मते जैवविविधतेला सर्वाधिक हानी पोहोचवणारा पदार्थ म्हणजे स्पेनचा लेचाझो, हा पहिल्या स्थानी आहे. यानंतर ब्राझीलमधील चार मासांहारी पदार्थांचा क्रमांक येतो, तर भारतातील इडली सहाव्या तर राजमा सातव्या क्रमांकावर आहे. यात चणा मसाला आणि चिकन जालफ्रेझी या यादीतील इतर पदार्थ आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach sjr
First published on: 30-03-2024 at 12:45 IST