Kitchen Jugaad Video: भारतीय थाळीमध्ये चपाती हमखास असतेच. चपाती खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. चपाती हा दररोजच्या जेवणातला सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे. चपाती पिठापासून बनविली जाते, हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. आतापर्यंत गव्हाच्या पिठापासून तुम्ही बरेच पदार्थ बनवले असतील. पण गव्हाच्या पिठात कधी साबण टाकून पाहिलं आहे का? आता तुम्हीही विचारात पडले असेल आम्ही तुम्हाला असा विचित्र प्रश्न का विचारतोय? गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. काही गृहिणी त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका व्हिडीओपैकी हा एक व्हिडीओ आहे. ज्यात चपातीच्या पिठाचा अनोखा वापर करून दाखवण्यात आला आहे.

गृहिणींकडे अनेक घरगुती युक्त्या असतात. दरम्यान अशाच एक स्वयंपाकघरातील जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पीठ आणि साबणाचा हा अनोखा जुगाड पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा: Jugaad Video: पंखा सुरु करण्याआधी ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; टेबल-खुर्ची न वापरता मिनिटांत होईल तुमचा पंखा स्वच्छ)

नेमकं काय करायचं? 

व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने सांगितल्यानुसार, चपाती केल्यानंतर आपण उरलेलं पीठ डब्ब्यात परत टाकतो किंवा फेकून देतो, असे न करता या उरलेल्या पिठामध्ये भांड्याची साबण किसून टाका आणि मिक्स करा. जवळपास प्रत्येक घरात अ‍ॅल्युमिनियमची भांडी स्वयंपाकासाठी वापरली जातात. परंतु ह्या अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे ते खूप लवकर घाण होते. कोरड्या पृष्ठभागामुळे अ‍ॅल्युमिनिअमची भांडी घासून स्वच्छ करणे खूप सोपे असले, तरी जेव्हा त्यावर जाड थर साचतो तेव्हा ते घासणे म्हणजे एक डोकेदुखी बनते. त्यामुळे तुम्ही या भांड्यांवर हा साबण आणि पिठाचा मिश्रण लावून हलक्या हाताने घासून पाहा. आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या…याच्या मदतीने डाग दूर करण्यासोबतच भांड्यांची चमकही वाढवता येईल, असे गृहिणीचे म्हणणे आहे. 

येथे पाहा व्हिडिओ

Puneri tadka या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)