Home made mouthwash : तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी ब्रश करणे आणि फ्लॉसिंग करणे महत्त्वपूर्ण आहे. पण माउथवॉश बद्दल काय? अमेरिकन डेंटल एसोसिएशनला एका अभ्यासात असे आढळले आहे की, माउथवॉश हे प्लाक, हिरड्यांना येणारी सुज, श्वासांची दुर्गंधी आणि दाताची कीड कमी करू शकते. त्यासाठी तुम्हाला बाजारातील महागडे माउथवॉश घेण्याची आवश्यकता नाही, तुम्ही घरच्या घरी देखील माउथवॉश बनवू शकता जे श्वासाची दुर्गंधी चुटकीसरशी गायब करू शकतात. चला जाणून घेऊन या घरच्या घरी माउथवॉश कसे करू शकता? हे जाणून घेऊ या…

तोंडाची स्वच्छता कशी राखावी?


मीठाचे पाणी
जर तुम्हाला तुमचे दात निरोगी ठेवायचे असतील तर तुम्ही मिठाच्या पाण्याने तोंड स्वच्छ करू शकता. या मिश्रणापासून बनवलेल्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडात साचलेले जीवाणू बाहेर पडतात, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी कमी होते. या पाण्याने ३० सेकंद गुळण्या करा.

हेही वाचा – झोपण्याआधी डोळ्यावर ‘ही’ वस्तू लावल्याने स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारते? परीक्षांच्या काळात तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती

हळद
हळद हा एक पिवळ्या रंगाचा मसाला आहे ज्यामध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो, जे जळजळ कमी करण्यास आणि हिरड्यांच्या रोगांपासून तोंडाचे संरक्षण करण्यास मदत करते. हळद दातांवरील पिवळा थर साफ करून प्लेक तयार होण्यास प्रतिबंध करू शकते.

लवंग, दालचिनी आणि पुदिना
दालचिनी हे दालचिनी अल्डीहाइडमुळे (Aldehyde) श्वासाच्या दुर्गंधीशी लढणारे एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषध आहे, जे तुमच्या लाळेतील जीवाणूंचे प्रमाण कमी करते. लवंग, दालचिनी आणि पुदिना या त्रिकूटामुळे श्वासाची दुर्गंधी दूर होईल आणि तुम्ही ते तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा वापरू शकता.

हेही वाचा – झोपेतून उठताच कॉफी पिता का? आताच सोडा ही सवय! तज्ज्ञांनी सांगितले कारण… 

अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमसह अनेक खनिजे असतात जे आपल्या दातांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगरचे फायदे आहेत.