Premium

‘या’ ५ पदार्थांवर लिंबू पिळून खाणं पोटासाठी ठरू शकतं विषारी; तुम्हालाही ऍसिडिटी होत असेल तर आधी वाचा

Do Not Squeeze Lemon On Food: तुम्हाला माहित आहे का काही पदार्थांबरोबर लिंबाचे एकत्रित सेवन केल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. नेमक्या कोणत्या पदार्थांबरोबर लिंबाचे सेवन टाळायला हवे?

Squeezing Lemon on These Five Items Can Be Poisonous For Stomach If You Suffer From Acidity Never Make These Mistakes
लिंबासह 'या' पदार्थांचे सेवन ठरू शकते विषारी (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Lemon & Food: लिंबू ही प्रत्येक घरात आढळणारी गोष्ट आहे. अगदी कोकणापासून ते विदर्भापर्यंत सर्वत्र लिंबाचा वापर विविध रूपात होतो. काही ठिकाणी लिंबाचं लोणचं सुद्धा बनवलं जातं. नुसत्या वरण भातावर सुद्धा तूप आणि लिंबाचा रस घातला तर त्याच्यासमोर भल्याभल्या रेसिपी फेल होतात. नॉनव्हेजबरोबर सुद्धा कांदा लिंबू आवर्जून ताटात वाढला जातो. यामुळे पदार्थांची चव आणखीन खुलून येण्यास मदत होते असं म्हणता येईल. पण तुम्हाला माहित आहे का काही पदार्थांबरोबर लिंबाचे एकत्रित सेवन केल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. नेमक्या कोणत्या पदार्थांबरोबर लिंबाचे सेवन टाळायला हवे आणि का याविषयी जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिंबासह ‘या’ पदार्थांचे सेवन ठरू शकते विषारी

दूध

लिंबात सायट्रिक ऍसिड असते, जे थेट दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये मिसळल्यास दुधाचा पोत पोत खराब होऊ शकतो. दूध व लिंबाचे एकत्र सेवन केल्याने ऍसिडिक प्रतिक्रिया होऊ शकतात आणि यामुळे छातीत जळजळ आणि ऍसिडिटी होऊ शकते.

जास्त मसालेदार पदार्थ

लिंबू ऍसिडिक आहे, ज्यामुळे मसालेदार पदार्थांची उष्णता तीव्र होऊ शकते. मसालेदार पदार्थांमध्ये लिंबू घालणे टाळा कारण यामुळे खाताना तर तुम्ही पदार्थ सहन करू शकता पण शरीरातील जळजळ वाढू शकते .

ताक आणि दही

दुधाप्रमाणेच, लिंबाच्या रसामुळे ताक आणि दही खराब होऊ शकते. जर तुम्हाला हे घटक एकत्र करायचे असतील तर ते हळूहळू आणि योग्य पदार्थांसह जोडून एकत्र करणे योग्य आहे.

व्हिनेगर

लिंबू आणि व्हिनेगर दोन्ही आंबटपणा प्रदान करतात, परंतु त्यांना मोठ्या प्रमाणात एकत्र केल्याने जास्त आंबट चव होऊ शकते. आपल्या रेसिपीनुसार या दोघांपैकी एक पर्याय वापरावा.

हे ही वाचा<< लिंबू सरबत प्यायल्याने किडनी स्टोन विरघळून लघवीमार्गे बाहेर पडतो? तुमची किडनी सुदृढ आहे का कसे ओळखाल?

पपईसारखी फळे

पपई हे एक असे फळ आहे जे संत्री, द्राक्ष किंवा लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांसह जोडल्यास जास्त नुकसान होते. याचे कारण असे की पपईमध्येच मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे लिंबू सारख्या इतर व्हिटॅमिन सी-समृद्ध स्त्रोतांसह खाल्ल्यास, ऍसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ आणि पोटात जळजळ होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Squeezing lemon on these five items can be poisonous for stomach if you suffer from acidity never make these mistakes svs

First published on: 29-09-2023 at 17:58 IST
Next Story
मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्सची गरज आहे का? संतुलित आहार हा अजूनही सर्वोत्तम पोषक घटक का आहे?