Visa On Arrival 2024, Countries For Indians: अनेक भारतीयांना परदेशात फिरण्याची आवड असते. परदेशात फिरण्यासाठी व्हिसा आवश्यक असतो. व्हिसा मिळवणे काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मोठ्या प्रक्रियेला समारे जावे लागते. काही देशांमध्ये परदेशी नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश दिला जात नाही. पण आजच्या काळात काही देशांमध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA) ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे ज्यामुळे प्रवाशांना प्रवासापूर्वी व्हिसासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA) म्हणजे परदेशी नागरिकाचे देशात आगमन झाल्यानंतर दिला जाणारा व्हिसा. या सुविधेमुळे परदेशी नागरिकांना परदेशातील प्रवास सुखकर होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA) सुविधांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे भारतीय पासपोर्ट धारकांसाठी परदेशात प्रवास करणे सोपे आणि अधिक सोयीचे झाले आहे. कारण अलीकडील हेन्ली पासपोर्ट इंडेक्स अहवालानुसार, “भारतीय पासपोर्ट जागतिक क्रमवारीत ८० व्या स्थानावर पोहोचला आहे ज्यामुळे भारतीय नागरिकांना २०२४ पर्यंत ५७ देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवास करण्याची परवानगी मिळते. व्हिसा ऑन अरायव्हलसाठी अर्ज करण्यासाठी, एखादी व्यक्ती सामान्यतः विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांना आवश्यक असलेली आवश्यक कागदपत्रे सादर करते. पण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA) म्हणजे आगमन व्हिसा विशिष्ट कालावधीसाठी आणि पूर्वनिश्चित शुल्क दिल्यानंतर जारी केला जातो.

हेही वाचा – तुमचा बॉस निर्दयी स्वभावाचा आहे का? खडूस बॉसबरोबर कसे वागावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स….

२०२४ मध्ये भारतीय पासपोर्ट धारकांना व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA)ची सुविधा देणाऱ्या देशांची यादी येथे आहे:

खंड-देश-मुक्कामाचा कालावधी

 • आफ्रिका-बुरुंडी(Burundi) -३० दिवस
 • आफ्रिका- केप वर्दे (Cape Verde)-३० दिवस
 • आफ्रिका-कोमोरोस(Comoros)-४५ दिवस
 • आफ्रिका-जिबूती(Djibouti)-३१ दिवस
 • आफ्रिका-इथिओपिया(Ethiopia)- १ महिना
 • आफ्रिका-गिनी-बिसाऊ(Guinea-Bissau)- ९० दिवस
 • आफ्रिका-मादागास्कर (Madagascar)-६० दिवस
 • आफ्रिका-मॉरिटानिया(Mauritania)- ९० दिवस
 • आफ्रिका-रवांडा(Rwanda)-३० दिवस
 • आफ्रिका-सेशेल्स(Seychelles) ३ महिने
 • आफ्रिका-सोमालिया(Somalia) ३० दिवस
 • आफ्रिका-टांझानिया(Tanzania) ३० दिवस
 • आफ्रिका-टोगो(Togo) ७ दिवस
 • आशिया-कंबोडिया (Cambodia) ३० दिवस
 • आशिया-इराण (Iran) ३० दिवस
 • आशिया-जॉर्डन (Jordan) ३० दिवस
 • आशिया-लाओस(Laos)३० दिवस
 • आशिया-मलेशिया (Malaysia)३० दिवस
 • आशिया-मालदीव (Maldives)३० दिवस
 • आशिया-मंगोलिया(Mongolia) ३० दिवस
 • आशिया-म्यानमार (Myanmar) ३० दिवस
 • आशिया-नेपाळ (Nepal)९० दिवस
 • आशिया-ओमान (Oman)१० दिवस
 • आशिया-कतार (Qatar)३० दिवस
 • आशिया-श्रीलंका (Shri Lanka) ३० दिवस
 • आशिया-तिमोर-लेस्टे (Timor-Leste)३० दिवस
 • आशिया-तैवान(Taiwan -Leste) १४दिवस
 • आशिया-थायलंड (Thailand) १५ दिवस
 • आशिया-व्हिएतनाम(Vietnam) ३० दिवस
 • युरोप-आर्मेनिया(Armenia) १२० दिवस
 • युरोप-बेलारूस (Belarus) ३० दिवस
 • युरोप-जॉर्जिया (Georgia) ९० दिवस
 • युरोप-तुर्की (Turkey)३० दिवस
 • उत्तर अमेरिका- सेंट लुसिया(Saint Lucia) ६ आठवडे
 • उत्तर अमेरिका-त्रिनिदाद आणि टोबॅगो(Trinidad and Tobago) ९० दिवस
 • उत्तर अमेरिका-ओशनिया मार्शल बेट(Marshall Islands) ९० दिवस
 • मायक्रोनेशिया(Micronesia)३० दिवस
 • उत्तर अमेरिका-नौरू(Nauru) १४ दिवस
 • उत्तर अमेरिका-पलाऊ(Palau) ३० दिवस
 • उत्तर अमेरिका-सामोआ(Samoa) ८०दिवस
 • उत्तर अमेरिका-तुवालु(Tuvalu)१ महिना
 • दक्षिण अमेरिका- बोलिव्हिय(Bolivia) -९० दिवस

हेही वाचा -पर्यटन मंत्रालयाची स्वदेश दर्शन यादी पाहिली का? या १० ठिकाणी प्रत्येक भारतीयाने दिली पाहिजे भेट, पाहा फोटो

व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे, भारतीय नागरिक आता प्रवास करण्यापूर्वी व्हिसा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळ वाय न घालवता अनेक देशांमध्ये प्रवास करू शकतात. २०२४ मध्ये भारतीय पासपोर्ट धारकांसाठी आगमन व्हिसा देणाऱ्या देशांची यादी दिली आहे ज्यामध्ये विविध देशांचा आणि विविध खंडाचा समावेश आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These countries offer visa on arrival for indians in
First published on: 20-02-2024 at 20:30 IST