Petrol Diesel Rate in Marathi: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधी दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आज १८ मे चे पेट्रोल आणि डिझेल दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाला. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात. जाणून घ्या आज दरात कसा बदल झाला…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरात आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कडून इंधनाच्या किंमती जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती सकाळी सहा वाजताच अपडेट केल्या जातात. कारची टाकी भरण्यापूर्वी, आज तुमच्या शहरात १ लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती आहे ?

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.७६९१.२६
अकोला१०४.२८९०.८४
अमरावती१०५.३६९१.८७
औरंगाबाद१०४.४७९०.९९
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०६.०३९२.५१
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.०४९१.६१
धुळे१०४.१०९०.६४
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.४९१.७६
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०४.२९९०.८४
लातूर१०५.१६९१.६७
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.३३९१.८३
पालघर१०३.८६९०.३७
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.०८९०.६१
रायगड१०४.८५९१.३२
रत्नागिरी१०५.७९९२.२९
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०५.१०९१.५९
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.६९९१.२२
ठाणे१०४.२८९२.२२
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.३७९१.८८

तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात. 

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel prices on saturday 18 may 2024 in state maharashtra new rates of fuel pdb
Show comments