‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून अभिनेत्री अनुष्का शर्माने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने सर्वांनाच भुरळ घातली. बॉलीवूडमध्ये जम बसवल्यावर वैयक्तिक आयुष्यात अनुष्काने २०१७ मध्ये भारतीय फलंदाज विराट कोहलीशी लग्नगाठ बांधली. या दोघांची जोडी फक्त देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. आजची तरुणपिढी विरुष्काला आदर्श जोडपं मानते.

आज अनुष्का शर्मा तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने विराटने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्काचा जन्म १ मे १९८८ रोजी झाला. आर्मी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यावर पुढे तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आजच्या घडीला अनुष्काचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुद्धा आहेत. याद्वारे तिने ‘एनएच १०’, ‘परी’, ‘फिलोरी’, ‘बुलबुल’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आपल्या लाडक्या बायकोला शुभेच्छा देण्यासाठी विराटने त्याच्या सोशल मीडियावर एकूण चार फोटो शेअर केले आहेत. यातील पहिले दोन अनुष्काचे सोलो फोटो आहेत. तर, उर्वरित दोन विरुष्काचे दोघांचे पाठमोरे फोटो आहेत.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील मित्रांची आठवण येते का? ओंकार भोजने म्हणाला, “त्या सगळ्यांशी…”

“माझ्या आयुष्यात जर तू आली नसतीस तर, कदाचित मी स्वत:ला पूर्णपणे हरवून बसलो असतो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय लव्ह! माझं आयुष्य तू सर्वार्थाने उजळून टाकलं आहेत. आम्ही ( विराट व मुलं ) तुझ्यावर खूप प्रेम करतो.” अशी पोस्ट शेअर करत विराटने अनुष्काला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार ‘अबीर गुलाल’! गायत्री दातारचं पुनरागमन, तर जोडीला असेल ‘बापल्योक’ फेम अभिनेत्री, पाहा प्रोमो

विराट-अनुष्काला काही दिवसांपूर्वी मुलगा झाला. २०२१ मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. तर, यावर्षी १५ फेब्रुवारीला या जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. विरुष्काने त्यांच्या लेकाचं नाव अकाय असं ठेवलं आहे.

हेही वाचा : ऐश्वर्या व अविनाश नारकरांना ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याने मागितली माफी; म्हणाला, “माझी कमेंट व भाषा…”

अकायच्या जन्मानंतर काही दिवसांपूर्वी अनुष्का भारतात परतली. परंतु, विमानतळावर आल्यावर “याबाबत कोणताही व्हिडीओ शेअर करू नये आपण नंतर एकत्र पार्टी करूयात… काही महिने जाऊदेत” अशी विनंती तिने पापाराझींना केली होती. आता विराट-अनुष्का एकत्र माध्यमांसमोर केव्हा येणार याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.