बॉलीवूडमधील सर्वात जास्त गाजलेल्या प्रेम प्रकरणांपैकी एक म्हणजे रेखा व अमिताभ बच्चन यांचं अफेअर होय. अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लग्नाला ५० वर्षे झाली असली तरी या प्रेम प्रकरणाची अजून चर्चा होते. रेखा यांनी त्यांच्या बिग बींवरील प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली होती. पण अमिताभ यांनी कधीच त्याबाबत प्रतिक्रिया दिली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खास गोष्ट म्हणजे जया यांनी अमिताभ यांनी लग्न करण्यापूर्वी रेखा व जया यांची खूप चांगली मैत्री होती. रेखा व जया दोघीही या एकाच बिल्डिंगमध्ये राहत होत्या. जया त्यावेळी इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होत्या, तर रेखा यांनी नुकतीच सुरुवात केली होती. त्यावेळी जया खूपदा रेखा यांना करिअर आणि आयुष्याबद्दल सल्ला देत असे, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे.

करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी OTT वर पाहता येणार; या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती कोणत्या? वाचा नावं

“अमिताभ आणि अन्वर (मेहमूदचे भाऊ) जवळचे मित्र होते. अन्वरने मला सांगितलं की त्याने अमिताभ आणि जया यांना अनेकदा लाँग ड्राईव्हवर नेलं होतं. दोघे कारच्या पुढच्या सीटवर बसायचे, तर रेखा मागच्या सीटवर बसायच्या आणि ते प्रवासात एकमेकांशी गप्पा मारायचे,” असं लेखकाने ‘मेहमूद: अ मॅन ऑफ मेनी मूड्स’मध्ये लिहिलं आहे. यासंदर्भात न्यूज १८ ने वृत्त दिलंय.

अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…

‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ हे रेखा यांच्यावरील पुस्तर यासर उस्मान यांनी २०१६ मध्ये लिहिलं होतं. या पुस्तकात ‘दीदीभाई’ नावाने जया बच्चन यांच्याशी संबंधित काही किस्से सांगितले आहेत. यात रेखा व जया यांच्या मैत्रीबद्दलही लिहिलंय. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने पुस्तकाच्या संदर्भाने दिलेल्या माहितीनुसार, “सुरुवातीचे काही चित्रपट हिट झाल्यावर रेखा यांनी १९७२ मध्ये मुंबईत स्वतःचा फ्लॅट विकत घेतला. हॉटेल अजिंठा सोडून रेखा वयाच्या १८ व्या वर्षी त्या जुहूच्या बीच अपार्टमेंटमध्ये राहायला गेल्या होत्या. त्याच बिल्डिंगमध्ये अभिनेत्री जया भादुरी राहत होत्या, त्या इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. बीच अपार्टमेंटमध्ये रेखा आणि जया अनेकदा भेटत असत. रेखा प्रेमाने जयांना ‘दीदीभाई’ म्हणायच्या आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी वारंवार त्यांच्या फ्लॅटवर जात असे. तिथेच रेखा यांची पहिली भेट जयाचे प्रियकर अमिताभ बच्चन यांच्याशी झाली होती.”

तमन्ना भाटियाच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, १७ दिवसांपासून करतोय तुफान कमाई; तुम्ही पाहिला का?

“असं म्हटलं जातं की त्या काळात गर्लफ्रेंड जया अमिताभ यांचा मोठा आधार होत्या. त्या बिग बींपेक्षा खूप यशस्वी होत्या आणि त्यांनी अनेक निर्मात्यांना बिग बींचे नाव सुचवले होते,” असं लेखकाने पुस्तकात लिहिलं आहे.

“ते गडकिल्ले तुमच्या बापाचे नाहीत”, गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी; म्हणाले, “तुम्ही असले चाळे…”

अमिताभ, जया व रेखा हे तिघेही यश चोप्रांच्या १९८१ साली आलेल्या ‘सिलसिला’मध्ये एकत्र दिसले होते. हा अमिताभ व रेखा यांचा एकत्र केलेला शेवटचा सिनेमा ठरला. हा चित्रपट कथानकामुळेही खूप गाजला. कारण याची कथा या तिघांच्याही आयुष्यावर बेतलेली असल्याचं बोलल्याचं बोललं गेलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When rekha used to go with amitabh bachchan jaya bachchan on long drives hrc
First published on: 21-05-2024 at 11:47 IST