scorecardresearch

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष देखील आहेत. उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईत झाला आणि महाराष्ट्रातील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांना दोन भाऊ असून राज ठाकरे चुलत भाऊ आहेत. ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला.


जमशेटजी जीजेभॉय स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे, यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा आदित्य ठाकरे हे देखील शिवसेनेचे नेते आहेत आणि सध्या ते महाराष्ट्र सरकारचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यावर ठाकरे यांनी राजकीय पदार्पण केले आणि पक्षाचा विजय झाला. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते त्यांच्या पक्षाचे राजकीय मुखपत्र सामनाचे मुख्य संपादक झाले. त्याच वर्षी राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. २०२१ मध्ये वडिलांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


Read More
Eknath Shinde, Eknath Shinde Slams Uddhav Thackeray, eknath shinde campaign for dhairyasheel mane, Hatkanangale lok sabha seat, Eknath shinde said never compromise Balasaheb thackeray s views, Eknath shinde criticize congress, marathi news, Eknath shinde news, cm Eknath shinde, lok sabha 2024, election news,
काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली – मुख्यमंत्री शिंदे

शिवसेना-भाजप पवित्र युतीला डाग लावण्याचे काम ज्यांनी केले त्यांना सडेतोड उत्तर देऊन कसलीही पर्वा न करता काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना…

What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीसांवर टीका, “मशालीच्या धगीने कमळ कोमेजणार, टरबुजाचं चिराट झालं”

उद्धव ठाकरेंनी प्रणिती शिंदेंच्या प्रचारसभेत मोदींना आणि फडणवीसांना उत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray Not Allowed to give Speech Badly Treated By Congress
उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे कार्यकर्ते बोलूच देईना? भरसभेत मंचावरील Video पाहून समर्थकांचा संताप, नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray Viral Video: एक वेळ होती जेव्हा बाळासाहेब ठाकरे सभेत उभे राहिले की अन्य कुणाला मध्यस्थी करण्याची हिंमतही होत…

Eknath shinde on uddhav thackeray
“माझं मत वर्षाताईंना”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर शिंदे गटाचा टोला; म्हणाले, “दुसऱ्या वर्षाला…”

या लोकसभा निवडणुकीत माझं मत वर्षा गायकवाडांना मिळणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर शिंदे गटाने टोला लगावला आहे.

uddhav thackeray eknath shinde
“आम्ही सुरतला गेल्यावर उद्धव ठाकरे भाजपा नेतृत्वाला फोन करून म्हणाले…”, एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ४० आमदार बंडखोरी करून सुरतला गेलेले असताना पडद्यामागे काय-काय घडत होतं? यावर मुख्यमंत्र्यांनी…

rajan vichare show of strength for lok sabha
ठाण्यात राजन विचारेंच्या शक्तीप्रदर्शनाला जुन्या जाणत्यांची साथ, इंडिया आघाडीतील घटक पक्षही सहभागी

ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदरसह आसपासच्या शहरांमधील साठी, सत्तरीकडे झुकलेले अनेक जुने शिवसैनिकांचे जथ्थे विचारे यांच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येत होते.

Criticism of Uddhav Thackeray on Devendra Fadnavis challenged directly
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray: ठाकरेंची टीका; फडणवीसांनी दिलं थेट आव्हान

भाजपाला मत म्हणजे विनाशाला मत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी काल (२८ एप्रिल) रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या सभेत बोलताना केली. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र…

vaishali darekar kalyan lok sabha marathi news
कल्याण लोकसभेत वैशाली दरेकर यांच्या प्रचार दौऱ्याकडे ज्येष्ठ शिवसैनिकांची पाठ

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिवसेनेतील एक गट राज ठाकरे यांच्या सोबत गेला. त्यामध्ये दरेकर यांचा समावेश होता.

Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीसांचा टोला, “उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार”

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला सोलापुरात उत्तर दिलं आहे. तसंच त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेलं विकासाचं एक काम दाखवा असंही…

संबंधित बातम्या