‘बिग बॉस १७’ च्या ग्रँड फिनानेला आता फक्त चार दिवस उरले आहेत. शो आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी हे टॉप पाच स्पर्धक फिनालेमध्ये पोहोचले आहेत. या शोमध्ये अंकिता लोखंडे तिचा एक्स बॉयफ्रेंड व दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल बऱ्याचदा बोलताना दिसली. यासंदर्भात तिला प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस’मधील स्पर्धकांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी ‘बिग बॉस’च्या घरात गेले होते. अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’ मध्ये इतर स्पर्धकांशी दिवंगत सुशांत सिंह राजपूतबद्दल का बोलते, हा तिच्या गेम शोचा भाग आहे का, असं विचारण्यात आलं. त्यानंतर तिने काय उत्तर दिलं, ते जाणून घेऊयात.

सासूबाईनंतर अंकिता लोखंडेच्या आईचाही तिने सुशांतचे नाव घेण्यावर आक्षेप, विकी जैनच्या कुटुंबाचा उल्लेख करत म्हणाल्या…

“मी नेहमी सुशांतबद्दल फक्त चांगल्याच गोष्टी बोलले, कारण मला वाटतं की या प्लॅटफॉर्मवरून मी त्याच्याबद्दल काही चांगल्या गोष्टी सांगू शकते तर मी ते का सांगू नये? त्याने चांगली कामं केली आहेत. आणि मी याबद्दल बोलू शकते कारण मला त्याच्याबद्दल माहित आहे आणि मी त्याचा प्रवास जवळून पाहिला आहे. त्यामुळे त्याच गोष्टी मी त्याच्याबद्दल बोलत असते,” असं अंकिता लोखंडे म्हणाली.

Video: विकी जैनच्या वडिलांनी अंकिता लोखंडेच्या आईची काढली लायकी, अभिनेत्रीचा खुलासा; पतीला म्हणाली, “तुझ्या घरात मला…”

पुढे अंकिता म्हणाली, “मी जिथे आहे तिथे सुशांतबद्दल बोलण्यात मला खूप अभिमान वाटतो आणि सुशांतबद्दल बोलण्यात काहीच गैर नाही. मी फक्त त्याच्याबद्दल मला माहीत असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलत आहे. जेवढं मला सुशांतबद्दल माहिती आहे, कदाचित ते इतर कोणालाच माहीत नाही आणि जर एखादा तरुण मुलगा त्याच्यासारखा होऊ इच्छित असेल तर मी त्याच्याशी सुशांतबद्दल नक्कीच बोलेन.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande explained why she talks about ex boyfriend sushant singh rajput in bigg boss 17 hrc
First published on: 24-01-2024 at 08:11 IST