पुणे दृतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार तर दोन जण गंभिर जखमी झाले. मृतांमध्ये चार महिना आणि दोन मुलांचाही समावेष आहे. क्वालिस आणि टेम्पो यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. मुंबई-पुणे दृतगती मार्गावर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोधिवली जवळ हा अपघात झाला. या अपघात जावळी तालुक्यातील धोंडेवाडी गावच्या धोंडे कुटूंबावर काळाने घाला घातला. हे सर्वजणगणेशोत्सव साजरा करून नवी मुंबई येथे परत येत होते.
गावावरून परतत असताना लोधीवली गावच्या हद्दीत त्यांच्या क्वालिस गाडीचा टायर फुटला, यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी दुभाजक ओलांडून पलिकडच्या बाजूला मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर गेली. आणि समोरून येणाऱ्या डंपरवर आदळली.

या भीषण अपघातात धर्मराज धोंडे (वय ४५), वेदांत धर्मराज धोंडे (वय १०), सुनिता धोंडे (वय ४०), अश्‍विनी धोंडे (वय १५), शुभम पवार (वय ७), सखुबाई पवार (वय ४०), व चित्रा धोंडे (वय ४०) यांचा मृत्यू झाला तर प्रतिक धोंडे (वय १६) व पुजा धोंडे (वय १५) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नवी मुंबईतील एम.जी.एम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी हा अपघात झाला. त्या ठिकाणी गेल्या महिन्याभरात झालेल्या विविध अपघातांमध्ये १० जण ठार झाले आहेत.
अपघात झाल्यानंतर पोलीस व आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. मात्र अपघातानंतर मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यास कुणीही धजावत नव्हते. अपघातानंतर लगेचच घटनास्थळी दाखल झालेले स्थानिकांनी पुढाकार घेऊन गाडीतील मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाजुला करण्यात आली.