अमरावती : अजित पवार हे राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनुभवी, दिग्‍गज नेते असतानाही त्‍यांना ज्‍या पद्धतीने कमी लेखण्‍याचा प्रयत्‍न झाला, त्‍याचा हा परिपाक आहे, अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणार, याची बरेच दिवसांपासूनची प्रतीक्षा होती, ती आता पूर्ण झाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नागपूर : समृद्धी महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात, दोघे अत्यवस्थ

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, यावेळी फार नवीन काही घडलेले नाही. अशा गोष्‍टी जुळून येण्‍यासाठी वेळ अत्‍यंत महत्त्वाची असते. ज्‍या पद्धतीने अजित पवार यांच्‍यासोबत राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक ज्‍येष्‍ठ नेते सरकारमध्‍ये आले आहेत, त्‍यावरून ‘मोदी है तो मुमकीन है’ ही बाब अधोरेखित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वावर विश्‍वास ठेवून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्‍ये सहभागी होण्‍याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्‍या अनुभवाचा फायदा निश्चितपणे महाराष्‍ट्राला होईल, असा विश्‍वास आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana reaction on ajit pawar after he entered the shinde bjp government mma 73 ssb