नागपूर : एका हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने पॅरोलवर बाहेर येताच विवाहित प्रेयसी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर प्रेयसीच्या १५ वर्षीय मुलीवरही त्याची नजर फिरली. प्रेयसीला घराबाहेर काढून तिच्या मुलीवर बलात्कार केला. प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. कुणाल भारत गोस्वामी (३३) रा. जरीपटका, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुणाल गोस्वामी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. २०१४ मध्ये कुणाल आणि त्याच्या साथीदारांनी पप्पू काळे नावाच्या गुडांचा भरचौकात चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणात न्यायालयाने कुणाल आणि त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पीडित महिला आणि कुणाल शेजारी होते. त्यामुळे त्यांच्यात ओळख होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पती घरी नसताना कुणाल महिलेशी शारीरिक संबंध ठेवत होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कुणाल पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला. तो प्रेयसीला भेटाण्यास तिच्या घरी गेला.

हेही वाचा >>> नागपूर : गर्भवती पत्नीला भेटून घरी परतणाऱ्या व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू

यावेळी जबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महिलेच्या गैरहजेरीतही तो तिच्या घरी जात होता. या दरम्यान त्याची प्रेयसीच्या १५ वर्षीय मुलीवर वाईट नजर पडली. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्या आईशी असलेले प्रेमसंबंध वडिलाला सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे नाईलाजास्तव मुलीने होकार दिल्याने त्याने लैंगिक अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. कुणालच्या गुंड प्रवृत्तीमुळे पीडित मुलगी गप्पच राहिली. जानेवारी २०२४ ला तो पुन्हा तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला. महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. त्यानंतर त्याने मुलीलाही संबंधाची मागणी केली. विरोध केला असता तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि धमकावून निघून गेला. मुलीने आईला घटनेची माहिती दिली. कुणालने यापूर्वीही जबरीने अत्याचार केल्याचे सांगितले. महिलेने प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी आरोपी कुणालवर लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. कुणाल विरुद्ध घरफोडी, लोकांना धमकावणे, खून व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद असल्याने कोणीही त्याच्या विरुद्ध तक्रार करीत नव्हते. यामुळे त्याची हिंमत वाढली होती. पॅरोलवर सुटल्यानंतर तो सतत महिलेचे लैंगिक शोषण करीत होता. मात्र मुलीचेही लैंगिक शोषण करीत असल्याचे समजल्याने महिलेने हिंमत करून पोलिसात तक्रार केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prison rape 15 year old minor girl after release on parole adk 83 zws
First published on: 28-01-2024 at 12:01 IST