पर्यावरणपूरक नॅपकिन वापराचे प्रमाण कमी

पर्यावरणास हानिकारक ठरणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनला बाजारात ‘मेन्स्ट्रल कप’, ‘पुनर्वापर करता येणारे कापडाचे पॅड’ आणि ‘टॅम्पून’असे तीन पर्याय  उपलब्ध आहेत. आजकाल पर्यावरणाबाबत मोठय़ा प्रमाणावर जागृती झाली असली तरी पर्यावरणपूरक नॅपकिनचा वापर लक्षणीय प्रमाणात होताना दिसत नाही. पूर्वी सॅनिटरी नॅपकिनबाबत सहजपणे चर्चा होणे दुर्मिळ असले तरी  युनेस्को, जागतिक आरोग्य संघटना व अन्य संघटनांनी केलेल्या जागृतीमुळे आता यावर मोकळेपणाने चर्चा होते. असे असले तरी नॅपकिनच्या वापराचे प्रमाण आजही अत्यल्प आहे.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
snatched compensation of 11 crores of land in Nilje village near Dombivli on name of dead person
डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला
Loksatta kutuhal Deep learning Internet data
कुतूहल: सखोल शिक्षण- आत्ताच का?
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…

मासिक पाळी दरम्यान पारंपरिक कापड वापरावे की सॅनिटरी नॅपकिन?  याविषयी वेगवेगळी मते आहेत. अगदी सुशिक्षित घरात नॅपकिन सोडून पारंपरिक कापडाच्या घडीकडे वळलेल्या महिला आहेत. मात्र, महाविद्यालयीन मुलींमध्ये  नॅपकिन वापराचे प्रमाण ७५ टक्के आहे. विविध जाहिराती व शहरातील सहज उपलब्धतेमुळे ही टक्केवारी वाढलेली असली तरी ग्रामीण भागात पारंपरिक रित्या कापडांच्या घडय़ांचा वापर आजही मोठय़ा प्रमाणावर केला जातो. सहज उपलब्धतेचा अभाव व किंमत यामुळे नॅपकिन वापराचे प्रमाण कमी आहे.

अ‍ॅमेझॉनवर ‘शीकप्स’ २०० ते १००० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. टॅम्पूनचची किंमत १० ते १२ रुपयांपर्यंत आहे. एक टॅम्पून कमीत  कमी सहा ते आठ तास चालते. तसेच पुनर्वापराचे कापडी पॅड धुवून वापरता येतात. शिवाय अशी पॅड ‘इको फ्रेंडली’ असून ती अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. एक पॅड तीन चार महिने वापरता येते. सॅनिटरी नॅपकिनपेक्षा ते स्वस्तात पडते.

आकडेवारीत फरक

सॅनिटरी नॅपकिन वापराची आकडेवारी कंपन्यांनुसार वेगवेगळी आहे. ‘पॅड मॅन’ चित्रपटात ४० टक्के महिला नॅपकिन वापरतात, असा उल्लेख असला तरी महिला महाविद्यालयाने केलेल्या  सर्वेक्षणात २८ ते ३० टक्के महिला नॅपकिन वापरतात, असा उल्लेख होता. युनोस्कोच्या अहवालानुसार २० टक्के भारतीय मुलींच्या शाळा गळतीचे कारण मासिक पाळी आहे. त्याला ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ हा कार्यक्रम जबाबदार आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये विद्यापीठ स्तरावर यासंदर्भात फारसे संशोधन, सर्वेक्षण होताना दिसत नाही.

सॅनिटरी नॅपकिन हा पर्यावरणाला व शरीराला घातक प्रकार आहे. त्याऐवजी पर्यावरणपूरक व आरोग्यदायी असे पर्याय उपलब्ध आहेत. त्यात ‘पुनर्वापर करता येणारे कापडाचे पॅड’, ‘शीकप’ आणि ‘टॅम्पून’ यांचा समावेश होतो. हे पर्याय उपलब्ध असतानाही भारतात त्याची माहिती नाही. प्लास्टिक बंदी झाली असताना त्याबद्दल जनजागृती मोहीम का होत नाही हे एक कोडेच आहे. मी गेल्या १२ वर्षांपासून टॅम्पून वापरते. सॅनिटरी नॅपकिन्स मी वापरत नाही किंवा अगदीच क्वचित डबल प्रोटेक्शन म्हणून.

– प्रा. रश्मी सोहनी, सी.पी. अ‍ॅण्ड बेरार कॉलेज

नॅपकिन वापराबाबत ग्रामीण व शहरी भागातही वेगवेगळे समज आहेत.  नॅपकिन किंवा पारंपरिक कापड कुणी ओलांडले तर मुले होत नाहीत,  ते जाळायलाच हवे वगैरे वगैरे. आम्ही महाविद्यालयात वेन्डिंग मशीन्स लावल्या. नॅपकिन जाळल्यावर फार कमी राख उरते म्हणजे ते नष्ट करणेही सोपे. असे असतानाही मुली कचरापेटीतच नॅपकिन टाकतात. मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. मात्र, त्याविषयी योग्य, शास्त्रशुद्ध ज्ञान नसणे आणि अनेक अंधश्रद्धा आजही आहेत, याचे आश्चर्य वाटते.

– डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ