Premium

झटपट नोकरीच्या आशेने विद्यार्थ्यांचा ‘आयटीआय’कडे कल

आयटीआय क्षेत्रातील तज्‍ज्ञांच्या मतानुसार, रोजगाराच्या सर्वाधिक आणि त्वरित संधी आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आहे.

ITI amravati
झटपट नोकरीच्या आशेने विद्यार्थ्यांचा 'आयटीआय'कडे कल (प्रातिनिधिक छायाचित्र)

अमरावती : सध्या तरुणाईचा कल उच्च शिक्षणापेक्षाही लवकरात लवकर कमावते होण्याकडे असल्याने, शिक्षणानंतर त्वरित रोजगार मिळण्याची शक्यता असलेल्या आयटीआयकडे (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) विद्यार्थ्यांचा वाढता कल असल्याचे चित्र दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयटीआय क्षेत्रातील तज्‍ज्ञांच्या मतानुसार, रोजगाराच्या सर्वाधिक आणि त्वरित संधी आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. अमरावती विभागात शासकीय आणि खासगी संस्‍था मिळून आयटीआयसाठी १५ हजार ८५६ जागा उपलब्ध आहेत.

हेही वाचा – सावधान! तीन दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात ‘यलो अलर्ट’

आयटीआयच्‍या प्रवेशाची प्रक्रिया आता जवळपास पूर्ण झाली आहे. अमरावती विभागाने ९८.३४ टक्‍के जागांवर प्रवेश पूर्ण करीत राज्‍यात अव्‍वल स्‍थान राखले आहे. १५ हजार ८५६ जागांपैकी १५ हजार ५९३ जागांवर प्रवेश झाले असून केवळ २६३ जागा रिक्‍त आहेत. राज्‍यातील एकूण ९३ हजार ४८४ जागांपैकी ८८ हजार ८८४ जागांवर विद्यार्थ्‍यांचे प्रवेश झाले आहेत. ही टक्‍केवारी ९५.०७ टक्‍के आहे. ४ हजार ६०० जागा रिक्‍त आहेत.

हेही वाचा – वर्धा : स्वरवैदर्भी ! मयूर पटाईत अव्वल, मेघे अभिमत विद्यापीठाची विदर्भस्तरिय गीतगायन स्पर्धा

राज्यातील उद्योगांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ‘आयटीआय’ प्रशिक्षित विद्यार्थ्यांची मागणी वाढली आहे. विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळत असल्याने अनेक कंपन्यांमध्ये हे विद्यार्थी चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. शिवाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास रोजगार उपलब्ध होत असल्याने निमशहरी; तसेच ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी ‘आयटीआय’मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students tend to iti with hope of quick job mma 73 ssb

First published on: 25-09-2023 at 09:48 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा