Premium

वर्धा : रुग्णालयासाठी गावातील वृद्ध रस्त्यावर

दोन ऑक्टोबर गांधी जयंतीस सत्तरी गाठलेले ज्येष्ठ महामार्गावर उपोषण सुरू करीत आहे. गांधीबाबांच्या प्रतिमेच्या साक्षीने सकाळी भजन व त्यानंतर संवाद साधण्याचा कार्यक्रम असल्याचे नागरी समस्या संघर्ष समितीने स्पष्ट केले.

old people hunger strike Karanja
वर्धा : रुग्णालयासाठी गावातील वृद्ध रस्त्यावर (image – loksatta graphics/pixabay/representational image)

वर्धा : ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व्हावे म्हणून कारंजा येथील तरुण आंदोलन करून दमले. बायाबापड्या पदर खोचून थकल्या. मात्र दाद मिळत नसल्याने आता गावातील वृद्ध रस्त्यावर उतरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – महिला उपसरपंचाचा पतीसह अवयवदान व देहदानाचा संकल्प

हेही वाचा – गुन्हा दाखल होण्याच्या काही तासांआधी संस्थाचालक पोलीस ठाण्यात; विद्यार्थिनींचा आरोप

दोन ऑक्टोबर गांधी जयंतीस सत्तरी गाठलेले ज्येष्ठ महामार्गावर उपोषण सुरू करीत आहे. गांधीबाबांच्या प्रतिमेच्या साक्षीने सकाळी भजन व त्यानंतर संवाद साधण्याचा कार्यक्रम असल्याचे नागरी समस्या संघर्ष समितीने स्पष्ट केले. कारंजा हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने वारंवार अपघात होत असतात. अपघातग्रस्तांना उपचार करण्यासाठी सोय नाही. परिणामी अनेक दगावतात. लगत अनेक खेडी आहेत. तेथील रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टर नसतात. हे अनेकवार शासन प्रशासनास सांगण्यात आले, पण अमल होत नसल्याने हा उपोषणाचा नाईलाज असल्याचे
विनोद चाफले म्हणतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The old people will go on a hunger strike for the hospital at karanja in wardha pmd 64 ssb

First published on: 01-10-2023 at 13:14 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा