वर्धा : प्रचाराच्या रणधुमाळीस आता चांगलाच वेग येत आहे. प्रचार बंद होण्यास आता अवघे चार दिवस बाकी आहे. या अंतिम टप्प्यात आपल्या उमेदवाराचा प्रभावी प्रचार करण्यासाठी सर्व क्षेत्र पिंजून काढल्या जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुनील केदार हे पण आज मुक्कामी दौऱ्यावर आले. त्यांनी आमदार अभिजित वंजारी यांच्यासोबत अमर काळे यांच्या प्रचारार्थ रॅलीत सहभाग घेतला. भाजपचे रामदास तडस यांना पराभूत करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, हा गांधी जिल्हा आहे. इथला शांतीचा विचार जगभर गेला. तो सर्वमान्य झाला. मात्र, तो विचार नाकारणारे आता सत्तेवर आहे. त्यांना घटनेचा विचार मान्य नाही. महात्मा मान्य नाही. एवढेच नव्हे तर ते महात्म्यांचा तिरस्कार करतात. अश्या गोडसे विचारास आपल्याला हाकलून द्यायचे आहे. त्याची सुरुवात या वर्धा जिल्ह्यातून करा आणि शांतीचा विचार प्रस्थापित करा, असे आवाहन सुनील केदार यांनी केले.

हेही वाचा – मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा

हेही वाचा – बुलढाणा लोकसभा निवडणुकीत यंदा ‘रांगविरहित मतदान’! काय आहे योजना जाणून घ्या…

आमदार वंजारी म्हणाले की ही संविधान बचावची लढाई आहे. त्यासाठी यात प्रत्येक नागरिकांने आघाडीच्या बाजूने उभे झाले पाहिजे. या जिल्ह्यास गांधी जिल्हा ही ओळख राहू देण्यासाठी जागे व्हा, असे वंजारी म्हणाले. यावेळी आघाडी निमंत्रक अविनाश काकडे, तसेच चारूलता टोकस, शेखर शेंडे, समीर देशमुख, मनोज चांदुरकर, प्रवीण हिवरे आदींची भाषणे झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha what did former guardian minister sunil kedar say about godse pmd 64 ssb