वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत डिसेंबर पासूनच द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होते परंतु यंदा मान्सून लांबल्याने द्राक्षांची छाटणी उशिरा झाली त्यामुळे बाजारात द्राक्षांचा हंगाम सुरू होण्यास विलंब होत आहे. बाजारात अद्याप केवळ २गाड्या दाखल होत आहेत तेच मागील वर्षी १०-१५ गाड्या दाखल झाल्या होत्या. द्राक्षचा हंगाम सुरू होण्यास आणखी महिना लोटणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उरण : मच्छिमारांमुळे जखमी फ्लेमिंगोला मिळालं जीवदान, पतंगाच्या मांज्याने दुखापत झाल्याची शंका

साधारणतः एपीएमसी बाजारात नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये द्राक्षची आवक सुरू होते. तसेच जानेवारी मध्ये द्राक्षांचे प्रमाण अधिक वाढते. साधारण १५ नोव्हेंम्बर नंतर द्राक्षची अधिक आवक सुरू होत असून १५ एप्रिल पर्यत हंगाम सुरू असतो. यंदा मात्र डिसेंबर,जानेवारी उजाडला तरी मोठया प्रमाणात आवक होत नाही. सध्या बाजारात २ गाड्या आवक होत असुन  ७४६क्विंटल द्राक्ष दाखल झाले आहेत.  १० ते१५ फेब्रुवारी नंतर बाजारात मोठया प्रमाणात द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होईल असे मत घाऊक व्यापारी व्यक्त करीत आहेत. बाजारात आंबट द्राक्ष दाखल होत असून प्रतिकिलोला  ६० ते १००रुपये बाजारभाव आहेत. ऑक्टोबर मध्ये छाटणी करण्यात येते परंतु पावसामुळे छाटणी पुन्हा एक महिना लांबणीवर गेली त्यामुळे उत्पादनाला ही विलंब होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grapes started arriving in vashi apmc market zws
Show comments