‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ च्या अनुषंगाने नवी मुंबई शहरात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिम राबविण्यात येत आहे. अशाच प्रकारे एक धडाकेबाज मोहीमेत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या तीन विक्रेत्यांवर धडक कारवाई करून त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले. साधारण १ टन २०० किलो प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही जप्त करण्यात आला आहे. तसेच पहिल्यांदा गुन्हा असल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १५ हजार रु इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई : स्लॅबचा भाग कोसळून बालकाचा मृत्यू

तुर्भे से १८ येथील महावीर मार्केट येथील साईपूजा प्लास्टिक येथील गोडाऊनवर धाड घालत तब्बल १२०० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा माल जप्त करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. या व्यावसायिकाकडून यापूर्वीही प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापराचा गुन्हा घडला आहे. हा दुसऱ्यांदा गुन्हा झाला असल्याने त्याच्यांकडून १० हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 1 ton of plastic stock seized in turbh navi mumbai dpj