लोकसत्ता टीम

पनवेल : पनवेल शहरातील लाईन आळी परिसरातील सेन्ट फ्रान्सीस न्यू चर्चमध्ये तीन दिवसांपूर्वी चोरी झाली. चर्चमधील कपाटातील पाच हजार रोख रकमेची चोरी झाल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला.  

१९ ते २१ जून या दरम्यान ही चोरी झाली. याबाबत दोन दिवसांपूर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चर्चच्या व्यवस्थापकांच्यावतीने तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी परिसराची पाहणी केली. चोरट्यांनी चर्चच्या इमारती मागील दरवाजा तोडून चर्चमध्ये प्रवेश करुन ही चोरी केल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.