काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याचे निश्चित झाले आहे. २७ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपण्यास एक दिवस शिल्लक असताना काँग्रेसने बुधवारी आपली उर्वरित यादी प्रसिद्ध केलीय. मनोज सीजी यांनी दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी राजस्थानचे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरच्या सभागृहातून संसदेत पोहोचणार आहेत. सोनिया बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जयपूरमध्ये पोहोचल्या असून, त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा आणि पक्षाचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित आहेत. उत्तर प्रदेशातील त्यांची रायबरेली लोकसभेची जागा बहुधा त्यांची मुलगी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस पक्षाच्या एका अध्यायाचा शेवट होत असला तरी काँग्रेसच्या यादीत आणखी कोणाला स्थान मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यसभेच्या ५६ जागांपैकी मध्य प्रदेशातील एका जागेसह काँग्रेसला राज्यसभेच्या किमान नऊ जागा राखण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचाः लोकसभा स्वबळावर लढण्याच्या ‘आप’च्या निर्णयानंतर काँग्रेसकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू; इंडिया आघाडीतील जागावाटपाचा तिढा वाढणार?

इंडिया आघाडीच्या अडचणींचे काय?

इंडिया आघाडीचे भविष्यव्य दिवसेंदिवस अंधकारमय दिसत असल्याने राज्यसभेच्या निवडणुका या क्षणी काँग्रेसच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत महत्त्वाच्या स्थानी असण्याची शक्यता नाही. जून २०२३ मध्ये काँग्रेसचा सुरू झालेला राजकीय प्रयोग हा अलीकडच्या आठवड्यात JD(U) आणि RLD च्या इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याने अयशस्वी ठरला आहे. ममता बॅनर्जी आणि भगवंत मान यांनीसुद्धा पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये काँग्रेसबरोबर जागावाटपाचा करार करण्यास नकार दिल्याने पक्षाच्या पदरी निराशाच पडली आहे. आता आपने दिल्लीतील मोठ्या जुन्या पक्षाला फक्त एका जागेची ऑफर दिली आहे. ‘आप’ने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गोव्यातून प्रत्येकी एक उमेदवार जाहीर केला असून, गुजरातमध्ये काँग्रेसचं प्राबल्य असलेल्या जागेवर उमेदवार दिला आहे.

आप संघटनेचे सरचिटणीस संदीप पाठक यांनी मंगळवारी सांगितले की, “जर आपण गुणवत्तेनुसार पाहायला गेलो तर काँग्रेस(दिल्लीमध्ये)ला एकही राखीव जागा देण्यास ती पात्र नाही.” जागा वाटपाची चर्चा अद्याप एका महिन्यापेक्षा जास्त काळ झाली नाही. तसेच दिल्ली काँग्रेसने ‘आप’शी युती करण्यास आपला विरोध व्यक्त केला होता, परंतु गेल्या काही महिन्यांत दोन पक्षांचे महत्त्वाचे नेतृत्व एकमेकांशी चर्चा करीत असल्यामुळे मतभेद कुठे तरी मागे पडले. आता ‘आप’चा संयम सुटत चालला आहे, असंही पाठक म्हणाले.

सध्या फक्त तामिळनाडूमध्ये काँग्रेसचा इतर पक्षांमध्ये जागा वाटपाचा करार सुरू आहे. पण तिथे द्रमुक आणि काँग्रेस यांच्यात आधीपासूनच युती आहे. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये जागावाटपाचा करार होण्याची शक्यता आहे. जर काँग्रेस आणि समाजवादी पक्ष (SP) यांच्यात करार झाला, तर उत्तर प्रदेश ही इंडिया आघाडीची पायाभरणी ठरेल.

हेही वाचाः कोकणात भाजपकडून मित्रपक्षांचीच कोंडी !

ओडिशात काय चालले आहे?

ओडिशातून तिसऱ्या राज्यसभेच्या जागेसाठी बीजेडी कोणाला उमेदवारी देईल यावर सस्पेंस सुरू असतानाच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बुधवारी भुवनेश्वरला दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. २०१९ मध्ये ओडिशा विधानसभेत भाजपकडे संख्याबळ नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना त्यांच्या पक्षाच्या समर्थनासाठी विनंती केल्यानंतर वैष्णव बीजेडीच्या पाठिंब्याने राज्यसभेत गेले. वैष्णव यांची उमेदवारी आता संपुष्टात आल्याने केंद्रीय मंत्र्याला संसदेच्या वरिष्ठ सभागृहात परत पाठवण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा समझोता होईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्हच आहे. बीजेडीकडे तिन्ही जागांवर उमेदवार देण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi has filed her candidature for the rajya sabha elections but what is the future of india vrd
First published on: 14-02-2024 at 12:53 IST