सध्या राहुल गांधी प्रतिनिधित्व करत असलेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून सीपीआयने ज्येष्ठ नेत्या ॲनी राजा यांना उमेदवार म्हणून घोषित केल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी या मतदारसंघातून खासदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला आता या मतदारसंघाची चिंता सतावू लागली आहे. CPI हा राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीचा एक भाग असताना त्याच्या मोठ्या भागीदाराप्रमाणे ते केरळमध्ये काँग्रेसचे कडवे प्रतिस्पर्धी आहेत. सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीचा राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटबरोबर वाद असल्याचे समजते. खरं तर दोन डाव्या पक्षांनी लोकसभेच्या जागांसाठी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेसला राहुल गांधींसाठी इतर कोणत्या राज्यात विशेषत: जिथे पक्षाचा प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपा आहे, अशा ठिकाणाहून उमेदवारी देण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ॲनी राजा म्हणाल्या, “केरळमधून निवडणूक लढवून काँग्रेस किंवा राहुल गांधींना काय फायदा होणार आहे? काँग्रेसकडे आपल्या नेतृत्वाकडे सुरक्षित जागेसाठी अनेक पर्याय आहेत. ते तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक अशा अनेक ठिकाणांहून लढू शकतात.” काँग्रेसने बुधवारी जाहीर केले की, ते केरळमध्ये त्यांच्या UDF आघाडीचा भाग म्हणून १६ जागा लढवतील, परंतु अद्याप उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. काँग्रेसच्या राज्य युनिटने मात्र राहुल गांधी यांनी वायनाडमधून पुन्हा निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा असल्याचे म्हटले आहे. २०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील गांधी घराण्याचा कौटुंबिक बालेकिल्ला अमेठीमधून भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधी याचा पराभव झाल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधींना केवळ या मतदारसंघानेच चेहरा वाचवण्यास मदत केली एवढेच नाही, तर त्यांच्या उमेदवारीमुळे केरळमध्ये इतर पक्षांचा अक्षरशः धुव्वा उडाला. राहुल गांधी यांनी त्यावेळी दुसऱ्या स्थानी असलेल्या सीपीआय उमेदवारावर वायनाडमध्ये ६४.८ टक्के मतांनी विजय मिळवला होता. खरं तर वायनाड ही काँग्रेसची सुरक्षित जागा आहे, ज्यामध्ये पक्षाने ती गेल्या तीन वेळा मोठ्या फरकाने विजय मिळवला होता, पक्षाने राहुल गांधींसाठी ती जागा निवडण्याचे ते एक महत्त्वाचे कारण आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन वर्षांनंतर झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीतही वायनाड लोकसभेमध्ये असलेल्या सात विधास विभागांमध्ये काँग्रेस प्रबळ पक्ष होता. केरळच्या अभूतपूर्व निकालात LDF पुन्हा सत्तेत आले तरीही काँग्रेसनं या जागांवर आघाडी घेतली होती. २०१४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत वायनाडची जागा काँग्रेसचे दिवंगत नेते एम आय शानवास यांनी जिंकली होती. २०१४ च्या निवडणुकीत गेल्या तीन निवडणुकांपैकी दोन पक्षांमध्ये सर्वात अटीतटीची लढत झाली होती, परंतु तरीही काँग्रेसच्या शानवास यांनी २०,९८७ मतांनी विजय मिळवला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does congress want rahul gandhi from wayanad even after cpi has given its candidate vrd
First published on: 29-02-2024 at 13:19 IST