पिंपरी : रावेतमधील अनधिकृत क्रिएटिव्ह ॲकॅडमीच्या निवासी शाळेच्या तळमजल्यावरील बेकायदा बांधकामावर महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली. वाहनतळ, मोकळ्या जागेवरील सर्व वर्ग खोल्या पाडण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिएटिव्ह ॲकॅडमीची तळमजल्यासह तीन मजली निवासी शाळा आहे. शाळेचा संचालक नौशाद शेख याला विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेत जावून पंचनामा केला होता. शाळेमध्ये निवासी वसतिगृहाची मान्यता नसताना ते बेकायदेशीरपणे चालविले जात असल्याचे समोर आले. निवासी शाळेची मान्यता नव्हती. अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखलाही नव्हता. इमारतीला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) मान्यता आहे. परंतु, शाळेतील वाहनतळ, मोकळ्या जागा बंद करुन अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत बांधकाम काढण्याची नोटीस दिली. परंतु, शाळेने बांधकाम काढले नाही. त्यामुळे महापालिकेने पाडण्याची कारवाई केली.

हेही वाचा – गडकरींच्या एका निर्णयाने राज्यसरकारच्या सहा हजार कोटींची बचत

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक शुक्रवारी सकाळी फौजफाट्यासह शाळेत दाखल झाले. दोन जेसीबीच्या सहाय्याने पाडकामाला सुरुवात केली. सहा वर्ग खोल्या, दोन कार्यालये, उपहारगृह, पत्राशेड अशा सहा हजार स्क्वेअर फुट अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, विद्यार्थी, पालकांनी साहित्य काढण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानुसार साहित्य काढण्यासाठी वेळ देण्यात आली होती.

सहायक आयुक्त अमित पंडित म्हणाले की, अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी १५ दिवसांपूर्वी शाळेला नोटीस दिली होती. परंतु, शाळेने स्वत:हून बांधकाम काढले नाही. अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. कारवाई दरम्यान कोणताही गोंधळ झाला नाही.

हेही वाचा – अजित पवार का म्हणाले, “…तर राजकारणातील माझी किंमत कमी होईल”

आमदार महेश लांडगे म्हणाले की, संस्थाचालक नौशाद शेख याने अनेक अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले. अशा प्रवृत्तींना थारा देवू नये आणि संबंधितांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाईची सूचना केली होती. महापालिकेने अतिक्रमणावर कारवाई केली. शेख याच्यावर आणखी कठोर कारवाई झाली पाहिजे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hammer on illegal construction of creative academy residential school in rawet pune print news ggy 03 ssb
First published on: 16-02-2024 at 22:23 IST