हत्या करणाऱ्या मित्रांची इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर आणि लाईक केल्यामुळे हत्या झालेल्या तरुणाच्या भावाने आदित्य भांगरे नावाच्या तरुणाची अपहरण करून गुजरातमध्ये जाळून हत्या केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. गुन्ह्यातील मास्टरमाइंड राहुल पवार ला गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. तो गेली एक महिना झालं वेशभूषा बदलून आसाम परिसरात राहात होता. राहुल मोबाईल देखील वापरत नव्हता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सविस्तर माहिती अशी की, आदित्य युवराज भांगरे याचा मित्र शंभू भोसले यांच्यासह इतर सहा जणांनी रितेश संजय पवार यांची किरकोळ कारणावरून हत्या केली होती. घटनेत सहा आरोपीना अटक ही झाली. सध्या ते येरवडा कारागृहात आहेत. परंतु, आदित्य युवराज भांगरे याने मित्र शंभू भोसले आणि त्याचे मित्राचे हत्ये केल्यानंतर ‘किंग ऑफ म्हाळुंगे’ अशी पोष्ट इन्स्टाग्रामवर शेअर आणि लाईक केली. इथूनच आदित्य च्या हत्येचे काउंडाऊन सुरू झालं. सराईत गुन्हेगार असलेल्या रितेश चा भाऊ राहुल याने आदित्यची पोष्ट पाहिली. भावाच्या हत्येतील गुन्हेराची पोष्ट ठेवल्याने राहुल चिडला. त्याने आदित्यच्या हत्येचा प्लॅन तयार केला. सराईत गुन्हेगार राहुल ने आदित्य च १६ मार्च २०२४ रोजी इतर साथीदारांच्या मार्फत अपहरण केलं. याबाबत आदित्य च्या आईने म्हाळुंगे पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तोपर्यंत आदित्य ला गुजरात येथे अज्ञात स्थळी नेऊन जाळून हत्या केली. तिसऱ्या दिवशी आरोपी राहुल पवार हा पुन्हा म्हाळुंगे परिसरात आला. संशयित पुणे- शिक्रापूर रोडवर हॉटेल मालकावर साथीदारांच्या मदतीने पिस्तूलातून गोळ्या झाडल्या. तो हॉटेल मालक थोड्यात बचावला. यासंदर्भात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्यातील आरोपी अमर शिंदे ला अटक करण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे: घरफोडीचे १५० गुन्हे दाखल असलेल्या ‘जयड्या’ गजाआड

तिथं आदित्य च्या हत्येचे बिंग फुटल. राहुल पवार ने इतर साथीदारांच्या मदतीने त्याची जाळून हत्या केल्याचं चौकशीत समोर आलं. पोलिसांनी खात्री करण्यासाठी पोलिसांच एक पथक गुजरात ला गेलं. तिथं आदित्य भांगारेचा जळालेल्या मृतदेह आढळला. आपला साथीदार पोलिसांच्या हाती लागल्याने राहुल पवार हा वेशभूषा बदलून आसाम बॉर्डरवर राहत होता. डोक्यावरील केस आणि दाढी काढल्याने त्याला ओळखणे कठीण होत. एक महिना राहुल पवार हा आसाम बॉर्डर परिसरात राहिल्यानंतर तो पुण्यातील औंध येथे येणार असल्याचे माहिती गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक हरीश माने यांना मिळाली. तिथं तात्काळ पोलीस पोहचले. रिक्षातून आलेल्या राहुल ला पोलिसांनी पकडलं, पण तो ओळखू येत नव्हता. तो त्याच नाव सागर संजय मोरे अस सांगत होता. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने राहुल पवार असल्याचं मान्य केलं. अखेर मुख्य मास्टरमाइंड राहुल पवार ला अटक करण्यात यश आले. राहुल पवार हा आणखी २ – ३ मर्डर करण्याच्या तयारीत होता. अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोरील आली आहे. राहुल ला शोधण्यासाठी पोलिसांनी १२४ सीसीटीव्ही ज्यात चौक, मेट्रो स्थानकाचा समावेश होता. तो ज्या परिसरात वावरत होता, तिथं ही शोधमोहीम राबविण्यात आली होती. ६७ व्यक्तींकडे त्याची चौकशी ही करण्यात आली होती. अखेर त्याला २२ एप्रिल २०२४ रोजी पडकण्यात गुंडा विरोधी पथकाला यश आले आहे. त्याला न्यायालयात हजर केला असता ४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status kjp 91 zws