उन्हाळा म्हटलं की मुलांच्या शाळांना सुट्या. एकीकडे मुलांचे खेळ-मस्ती सुरु असते तर दुसरीकडे महिलांची उन्हाळी वाळवणाची तयारी सुरु असते. आपल्यापैकी अनेकांनी बालपणी आईला पापड, कुरडई तयार करण्यासाठी मदत केली असेल. पुर्वी शेवया देखील हातावर केल्या जात असे. हातावरच्या शेवयाची चव अगदी वेगळीच असते. आजकाल शेवया मशीनद्वारे बनवल्या जातात. सोशल मीडियावर सध्या अशाच हातावरच्या शेवया करणाऱ्या काकूंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांच्या बालपणीच्या आठवणी जागा झाल्या आहे.

इंस्टाग्रामवर lets_bake_wid_jago नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यरल व्हिडीओमध्ये दिसते, एक महिला अगदी कुशलतेने पीठापासून शेवया तयार करत आहे. पीठ ओढून त्याला मऊ करताना दिसत आहेत त्यानंतर अगदी सहज हातावरच लांब शेवया तयार करताना दिसत आहे. हे काम दिसते ते तितके सोपे नाही. व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी काकूंचे कौतूकही केले. एकाने कमेंट करत लिहिले की, हातावरच्या पाटावरच्या शेवया हाताने एकेरी वाळलेल्या आणि आणि ह्या आता पाहत आहोत त्या शेवया, लहानपणीचे दिवस आठवले आणि मन भरून आलं. ही कला टिकली पाहिजे.” दुसऱ्याने लिहिले की, “हे बघून मला माझ्या आईची आठवण आली. माझी आई करायची अशा शेवया, दोघी माया-लेकी मिळून करायचो आम्ही” तिसरा म्हणाला,”येथे लोकांना मशीनवरीही व्यवस्थित शेवया जमत नाही आणि तुम्ही हातावर एवढ्या छांना शेवया बनवत आहात खूप छान काकू”

व्हिडीओ पाहून तुम्हाला हातावरच्या शेवया कशा बनवतात हे जाणून घेण्याची उत्सूकता असेल चला तर मग जाणून घेऊ या..

हातावरच्या शेवयांसाठी रवा कसा तयार करावा?
हातावरच्या शेवयांसाठी बन्सी गहू वापरला जातो कारण तो चिकट असतो आणि पाढंरा असतो. या गव्हाच्या चपत्याही पांढऱ्या होतात. प्रथम गहू साफ करून एका भांड्यात घ्या. त्यात मीठ टाका. पाणी टाकून चांगले धूवून द्या. ५ ते १० मिनिटे गहू भिजवून घ्या. हे पाणी काढू घ्या.त्यानंतर गहू चाळणी काढा आणि पाणी काढून टाका. काही वेळाने एक सुती कापडामध्ये गहू बांधून सात-आठ तास ठेवा. त्यानंतर गहू चांगले कोरडे होतात. नंतर चक्कीतून गहू वाटून आणा. गव्हाची भरड वेगळी करून रवा तयार केला जातो. रवा काढताना चांगला चाळून कोंडा वेगळा करा. दोन तीन वेळा बारीक चाळणीने चाळून घ्या. हातावरच्या शेवयांसाठी हा रवा काढावा. बारीक रवा, जाड रवा आणि मैदा देखील वेगळा करता येईल.

हातावरच्या शेवया कशा तयार करतात?

रवा आणि मैदा एकत्र करून घ्या. एक किलो पीठ एका भांड्यात घेऊन पीठ मळून घ्या. घट्ट मळून घ्या.२ते ३ तास पीठ भिज ठेवा. शेवया करताना मीठ टाकावे. त्यासाठी एका परातीमध्ये मीठ टाका आणि पाणी टाका मग पुन्हा त्यात पीठ चांगले मळून घ्या. आता खलबत्त्यामध्ये पीठ खोदून घ्या. ते पीठ चांगले मऊ होते. त्यामुळे शेवयाची तार येते. हाताला तूप लावून समान पिठाचे समान आकाराचे गोळे तयार करा. त्यानंतर हाताला तूप लावून एक गोळा घेऊन हातावर वळतात. त्यानंतर बोटांमध्ये धरून त्याची बारीक शेवया तार करा. त्यानंतर एक हात सरळ आणि दुसरा हात उलटा करून तयार शेवया हातावर गुंडाळून घेतात आणि हलक्या हाताने लांब होईपर्यंत ओढताता. शेवया तुटणार नाही याची काळजी घ्या. शेवया काठीवर वाळत घाला. अशा प्रकारे हातावरच्या शेवया केल्या जातात.