दिवसभर कामं धामं करून थकून भागून आल्यानंतर स्वस्थ मनाने जेवल्यास आपण कसे ताजेतवाने होतो. साधंच , पण रुचकर व पौष्टिक जेवण नक्कीच शरीरास पोषक ठरते. अंबाडीच्या भाजीबरोबर गरम गरम भाकरी , कांदा , शेंगदाणे आहाहा , मस्त …तुम्ही पण करून पहा..तांदूळ आणि चणाडाळ घालतेली ही भाजी म्हणजे पूर्णान्न आहे. अशीच खायला ही छान लागते. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबाडी भाजी साहित्य

  • १ जुडी अंबाडी भाजी
  • १/२ जुडी मेथी भाजी
  • दीड टेबलस्पून तूर डाळ
  • १ टेबलस्पून शेंगदाणे
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • ५-६ लसूण पाकळ्या
  • १ ,टीस्पून जिरे
  • १/४ टीस्पून हळद
  • १/२ टीस्पून लाल तिखट
  • चवीपुरते मीठ
  • ८-१० पानें कढीपत्ता
  • १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • फोडणीस तेल

अंबाडी भाजी कृती

स्टेप १
दोन्ही भाज्या स्वच्छ धुऊन निवडून घ्या. पॅनमध्ये ४-५ कप पाणी घेऊन, त्यांत शेंगदाणे व दोन्ही भाज्या टाकून, छान वाफवून घ्या. तूर डाळ कुकरमध्ये ठेवून त्याला तीन शिट्ट्या करून शिजवून घ्या.

स्टेप २
वाफलेल्या भाज्यांचे पाणी वेळुन काढा, म्हणजे अंबाडीचा आंबटपणा कमी होईल.
एका भांड्यात भाज्या व शिजलेली तूर डाळ टाकून त्यांत चवीपुरते मीठ, हळद टाका.रवीने किंवा ब्लेंडर ने फिरवून भाजी घोटून घ्या. हिरव्या मिरच्या जिरे व लसूण मिक्सरला फिरवून त्याचे वाटण तयार करा.

स्टेप ३
कढईत तेलाची फोडणी करून, त्यांत मोहरी – जिरे टाकून तडतडू द्या. फोडणीत हिरव्या मिरचीचे वाटण टाकून, हळद टाका. ते छान परतल्यावर, त्यांत घोटलेली अंबाड्याची भाजी टाकून, छान उकळू द्या.

हेही वाचा >> बटाटयांची सुकी भाजी; नैवेद्याच्या पानावर वाढली जाणारी बटाटा भाजी एकदा नक्की ट्राय करा

स्टेप ४

झक्कास पैकी अंबाडी भाजी तयार ! ही भाजी गरम गरम भाकरी बरोबर किंवा शिळ्या भाकरी बरोबर सुद्धा अगदी भन्नाट लागते.

अंबाडी भाजी खाण्याचे फायदे

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते- एस्कॉर्बिक ऍसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी हा घटक रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यात आणि शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढविण्यात मोठी भूमिका बजावते.

रक्तदाब नियंत्रित ठेवते- अंबाडीची भाजी उच्च रक्तदाब कमी करून नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. अंबाडी भाजीत अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

मधुमेहासाठी चांगले- अंबाडी भाजी ही फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करतो, पारंपारिकपणे ही भाजी मकाई, बाजरी आणि नाचणीच्या भाकरीसोबत खाल्ले जाते जे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करणारे संमिश्रित जेवण आहे.

वजन कमी करते- अंबाडी हा लो कॅलरीज डायट असून अनेक पोषकतत्वे, व्हिटॅमिन, फायबर्स यामध्ये असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात या भाजीचा समावेश करू शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi srk
Show comments