ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. चला तर मग आज रविवार स्पेशल खानदेशी अंडाकरी रेसिपी पाहुयात. खानदेशी अंडाकरी मध्ये मसाल्यामध्ये थोडा फरक आहे. त्यामुळे सोपी आणि झणजणीत अशी खानदेशी अंडाकरी तुम्हीही नक्की ट्राय करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खानदेशी अंडा करी साहित्य

  • ६ उकडलेली अंडी
  • २ कांदे चिरून मसाल्यासाठी
  • १ हिरवी मिरची
  • थोडी कोथिंबीर
  • २ टेबलस्पून धने
  • २ टेबलस्पून खोबरे किस
  • ४-५ मिरे
  • २ लवंग
  • १ इंच दालचिनीचा तुकडा
  • ६-७ लाल मिरच्या
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • २ इंच आले
  • ४ टेबलस्पून तेल
  • १ टीस्पून हळद
  • १/२ टीस्पून मसाला
  • चवीनुसार मीठ
  • कोथिंबीर

खानदेशी अंडा करी कृती

स्टेप १
सर्व सामग्री जवळ ठेवावी. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडे तेल टाकुन कांदा लसूण आले सोनेरी रंगावर भाजून घ्यावे. त्याच प्रमाणे सर्व खडा मसाला भाजून घ्यावा. त्यातच खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा.

स्टेप २
लाल मिरची भाजून घ्यावी. त्यानंतर सर्व भाजलेले पदार्थ, हिरवी मिरची, कोथिंबीर एकत्र करून मिक्सरमधून थोडे पाणी टाकून त्याची पेस्ट करून घ्यावी. करी साठी मसाला तयार झालेला आहे.

स्टेप ३
अंडे उकडून घ्यावेत. त्याची साले काढून घ्यावीत आणि त्याला तीन किंवा चार चिरा देऊन घ्याव्यात. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून, थोडी हळद टाकावी.

स्टेप ४
गरम झाल्यावर त्यात सर्व सोललेली अंडी टाकून छान परतून घ्यावीत. अंडी काढून घ्यावीत. त्याच पॅन मध्ये करी साठी पाणी गरम करावे.

स्टेप ५
आता करी करण्यासाठी, एका कढईत तेल टाकून गरम झाल्यावर त्यात वाटलेला मसाला टाकावा. कमी गॅसवर, हा मसाला छान परतून घ्यावा. जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही.

स्टेप ६
आता त्यात हळद घालून मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात गरम केलेले पाणी टाकावे. आणि छान २-३ उकळ्या येऊ द्याव्यात. पाणी टाकताना आपल्याला करी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे, त्यानुसार पाणी टाकावे.

स्टेप ७
आता उकळल्यानंतर, त्यात मसाला टाकावा. चवीनुसार मीठ टाकावे. अंडी टाकावी.

स्टेप ८
त्यानंतर त्याला पुन्हा एक उकळी आली की गॅस बंद करावा. आता वरून कोथिंबीर टाकावी. खानदेशी अंडा करी तयार आहे, जेवणासाठी…

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshi anda curry recipe in marathi khandeshi non veg recipes in marathi srk