Peanut Chutney Recipe: जेवायला बसल्यानंतर भात, भाजी, चपाती व्यक्तीरिक्त काहीतरी चटपटीत, तिखट तोंडी लावणीसाठी असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. लोणचं रोज रोज खायला सर्वांनाच आवडतं असं नाही. भाजलेल्या शेंगदाण्यांची चटणी अगदी कमीत कमी वेळात तयार होईल आणि जास्त मेहनतही करावी लागणार नाही. जर भाजी बनवली नसेल तर चपातीबरोबर, खिचडीबरोबर किंवा डाळ भातसह ही चटणी तुम्ही खाऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेंगदाण्याची खानदेशी पद्धतीची पातळ चटणी साहित्य

  • १/२ वाटी शेंगदाणे
  • ५ हिरव्या मिरच्या
  • ६ लसूण पाकळ्या
  • १/४ वाटी कोथिंबीर
  • मीठ स्वादानुसार
  • आवश्यकतेनुसार पाणी

शेंगदाण्याची खानदेशी पद्धतीची पातळ चटणी कृती

स्टेप १
सर्वप्रथम शेंगदाणे व मिरच्या थोड्या भाजून घ्याव्यात. जास्त भाजू नये.

स्टेप २
आताही शेंगदाणे थोडे थंड होऊ द्या. तोपर्यंत कोथिंबीर व मिरच्या बारीक कापून घ्या. लसूणही कापून घ्या.

स्टेप ३
आता मिक्‍सरच्या छोट्या भांड्यामध्ये शेंगदाणे मिरच्या व लसूण घाला. व बारीक वाटून घ्या. आता यात कोथिंबीर घाला व मीठ घाला. पुन्हा चांगलं बारीक वाटून घ्या.

हेही वाचा >> विदर्भ स्पेशल: थंडीसाठी खास गरमागरम “डाळ वांगे” वांगी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत, खाऊन मन होईल तृप्त

स्टेप ४
आता या चटणी मध्ये पाणी घालून पुन्हा फिरवून घ्या. ही चटणी दर्शनी अथवा पोळी सोबत खूप छान लागते. खानदेशामध्ये या चटणीवर शेंगदाण्याचे तेल घेण्याची पद्धत आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shengdana chutney recipe khandeshi recipe peanut chutney recipe in marathi srk
Show comments