Premium

व्यक्तिवेध: समीर शाह

बीबीसी ही ब्रिटनची सार्वजनिक माध्यम कंपनी असल्यामुळे, तिला कामकाजाची वा कार्यक्रमांच्या बाबतीत स्वायत्तता असली तरी तिच्या प्रमुखांची निवड सरकारकडूनच जाहीर केली जाते.

Freedom of Media in India British Broadcasting Corporation Sameer Shah Selection announced
व्यक्तिवेध: समीर शाह

भारतातील माध्यमांचे स्वातंत्र्य, त्यांचा कामाचा दर्जा या गोष्टींवर प्रश्नचिन्ह लावले जाण्याच्या सध्याच्या काळात बीबीसी म्हणजे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या ब्रिटिश माध्यम क्षेत्रातील अखेरचा शब्द मानल्या जाणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे डॉ. समीर शाह यांची निवड जाहीर झाली असून त्यांच्या अधिकृत नियुक्तीची फक्त औपचारिकताच बाकी आहे. समाजमाध्यमांच्या वाढत्या पसाऱ्यात झाकोळलेला माध्यम व्यवसाय, बीबीसीने जाहीर केलेली ५० कोटी पौंडांची खर्चकपात, परवाना फी दोन वर्षांसाठी गोठवलेली असल्याने निधीत वाढ होण्याची शक्यताही कमी, आधीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांची वादग्रस्त कारकीर्द अशा सगळय़ा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारने अध्यक्षपदासाठी समीर शाह यांचे नाव निश्चित केले आहे आणि ७१ वर्षीय समीर शाह हा डोलारा सांभाळायला सज्ज झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे शाह कुटुंब मूळचे औरंगाबादचे. १९६० साली- म्हणजे समीर शाह ११ वर्षांचे असताना आईवडिलांसह ते इंग्लंडला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. त्यांनी बीबीसीमध्ये चालू घडामोडी आणि राजकीय कार्यक्रम विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे. त्याशिवाय २००७ ते २०२० या काळात ते बीबीसीचे अ-कार्यकारी संचालक होते. त्याआधी ज्युनिपर या स्वतंत्र टेलिव्हिजन आणि रेडिओ निर्मिती कंपनीचे ते मालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि त्याहीआधी- १९७९ पासून ‘लंडन वीकएन्ड टेलिव्हिजन’ या कंपनीत संशोधन प्रमुख असा चित्रवाणी कार्यक्रम-निर्मिती आणि माध्यम क्षेत्राचा ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. चित्रवाणी क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना २०१९ मध्ये इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनी ‘सीबीई’(कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर) हा किताब बहाल केला होता.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Freedom of media in india british broadcasting corporation sameer shah selection announced amy

First published on: 08-12-2023 at 02:40 IST
Next Story
चिंतनधारा: जब देश की शान बिखर जाये..