लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना मोबाईलमध्ये गेम्स (games) खेळायची खूप जास्त आवड असते. प्रत्येक जण त्यांच्या मोबाईलमध्ये आवडीचे चार ते पाच गेम्स तर नक्कीच डाउनलोड करून ठेवतात आणि वेळ मिळेल तसं मोबाईलवर हे ओपन करून खेळायला सुरुवात करतात. पण, हे गेम्स मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यामुळे तुमचा फोन हँग होतो किंवा स्टोरेजची समस्या निर्माण होते. तर आता तुम्हाला मोबाईलमध्ये विविध गेम्स डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. कारण, एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक अनोखं फिचर लवकरचं सर्व युजर्ससाठी सादर करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडिया प्लॅटफार्म युट्युब वापरकर्त्यांसाठी ही खास बातमी आहे. गूगलचे व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्युब एक नवीन फिचरची चाचणी करत आहेत. युट्युब युजर्सना गेम डाउनलोड आणि इंस्टाल न करता गेम खेळण्यास परवानगी देईल. या फिचरचे नाव ‘युट्युब प्लेबल’ (Youtube Playables) असे आहे. कंपनी या फिचरवर सध्या काम करते आहे. सप्टेंबर मध्ये कंपनीने या बाबत घोषणा केली होती की, मोबाईल आणि डेक्सटॉप या दोन्ही प्लॅटफॉर्मवर एचटीएमएल ५ ( HTML5) आधारित युजर गेम खेळू शकतील आणि या फिचरमुळे युजर्सना अनावश्यक ॲप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही.

कोणत्या युजर्ससाठी असणार उपल्बध :

युट्युब प्लेबल (Playables) सध्या मर्यादित युजर्स म्हणजेच युट्युब प्रीमियम सदस्यांसाठीच उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा…गुगल मेसेजवर चॅट्स Archive कसे कराल? फॉलो करा ‘या’ स्टेप्स…

युट्युब प्लेबल (Playables) मध्ये प्रवेश कसा करायचा?

कंपनीने होम फिडमध्ये प्लेबल नावाचे फिचर जोडले आहे.युट्युबने हे फिचर काही युजर्ससाठी उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. कोणीही युट्युब प्लेबल मध्ये सहज प्रवेश करू शकतात. तसेच युट्युब प्रीमियम सदस्यांसाठी ही प्रक्रिया अगदीच सोपी ठरेल. या युजर्सना फक्त युट्युब ॲपवर जाऊन प्रोफाइल मध्ये जावं लागेल. येथे, तुम्हाला “Your Premium Benefits” दिसेल. त्यानंतर फक्त यावर क्लिक करा.ट्राय एक्सपेरिमेंटल न्यू फिचर्सवर (Try experimental new feature) वर पुन्हा टॅप करा. मग तुम्हाला युट्युबवर नवीन गेम विभाग दिसेल ; जो तुम्ही वापरून पाहू शकता. ज्या लोकांना अद्याप ते मिळालेले नाही ; त्यांना अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी काही आठवडे प्रतीक्षा करावी लागेल. हे अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर मोबाइल ॲपद्वारे प्रवेश करण्यायोग्य आहे.

नवीन फिचर अंतर्गत अँग्री बर्ड्स शोडाउन (Angry Birds Showdown), डेली क्रॉसवर्डचा (Daily Crossword), स्कूटर एक्सट्रॅम (Scooter Extreme), कॅनन बॉल्स 3D (Cannon Balls 3D) आदी खेळ खेळू शकणार आहात. हे खेळ तुम्ही मोबाईल किंवा डेस्कटॉपवरसुद्धा खेळू शकणार आहात. तसेच गूगलचे व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्युब प्लेबल हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी लवकरच उपलब्ध करून देणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enjoy playing games on youtube app with playables feature without downloading any app asp
Show comments