तुमच्या मोबाइलमधील मेसेज (Message) ॲपवर बँक डिटेल्स, तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तूंची माहिती, रिचार्जसंबंधित मेसेज इथे येतात. तसेच तुम्ही मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबाबरोबर इथे संवाददेखील साधू शकता. एखाद्या वेळेस मोबाइलचा नेट (Net) संपला असेल तर तुम्ही या गुगल मेसेजचा वापर करून संवाद साधू शकता. तर या गुगल मेसेजवरील तुमचे काही खासगी चॅट्स तुम्ही एका वेगळ्या फोल्डरमध्येसुद्धा ठेवू शकता. या मेसेज ॲपवर तुम्हाला Archive हा पर्याय दिसेल. इथे जाऊन तुम्ही तुमच्या पर्सनल चॅट्स अगदीच सुरक्षित ठेवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर मेसेज ॲपवरील तुमच्या खासगी चॅट्स सुरक्षित ठेवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :

1.सगळ्यात पहिल्यांदा गुगल मेसेज ॲप ओपन करा.
2.तुमच्या मोबाइलध्ये असणारा मेसेज (Message) ॲप अपडेटेड आहे का याची खात्री करून घ्या.
3.त्यानंतर ॲपमध्ये कॉनव्हरसेशन (conversations) किंवा चॅट (Chat) सेक्शनमध्ये जा.जिथे तुमच्या मोबाइलमधील अलीकडेच आलेल्या मेसेजची तुम्हाला यादी दिसेल.
4.त्यानंतर तुम्हाला जी चॅट Archive करायची आहे, त्या चॅटवर तुम्ही लाॅंग प्रेस करा किंवा थ्री व्हर्टिकल डॉट म्हणजेच ऑपशनल मेन्यूवर (Optional Menu) क्लिक करा.
5.तर चॅट सिलेक्ट केल्यानंतर Archive या पर्यायावर क्लिक करा. हा पर्याय मजकुरात लिहिलेला किंवा एका आयकॉनमध्येसुद्धा असू शकतो. कारण, तुम्ही मेसेज ॲप अपडेट केला आहे की नाही यावर हा पर्याय अवलंबून असेल.

हेही वाचा…आता तुमच्या मोबाईलमधील सिम कार्डची जागा घेणार ई-सिम ! जाणून घ्या फायदे…

6.तर तुम्ही Archive या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमची चॅट Archive या फोल्डरमध्ये तुम्हाला दिसेल.
7.तसेच तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही Unarchive हा पर्याय निवडून तुमची चॅट फोल्डरमधून परत आणू शकता.
8.तसेच तुम्ही एका वेळी अनेक युजर्सशी चॅट Archive करू शकता.
9.अशाप्रकारे तुम्ही मोबाइलमधील मेसेज (Message) ॲपवर तुमचे पर्सनल मेसेज एका फोल्डरमध्ये सुरक्षित ठेवू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to archive chats on google messages follow these steps asp