Viral Video: आपल्यातील अनेकांना स्वयंपाक करायला भरपूर आवडते. अशातच स्वयंपाक करतानाचे सर्वात कठीण काम कोणतं असेल तर ते म्हणजे पोळ्या करणे होय. त्यामुळे घरापासून दूर वसतिगृहात राहणारी राहणारी मुलं अनेकदा अन्न शिजवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत राहतात, जेणेकरून त्यांचे अन्न कमी कष्टात व कमी वेळेत तयार करता येईल. कारण पोळी करायची असेल तर आधी कणिक मळून मग पोळ्या लाटून आणि नंतर शेकून घ्याव्या लागतात. पण, यावर आज काही तरुणांनी अनोखा जुगाड शोधून काढला आहे. वसतिगृहात किंवा हॉस्टेलमध्ये राहणारी बहुतेक मुलं पोळ्या बनवणे टाळतात आणि फक्त डाळ-भात खाऊन पोट भरतात. अशा परिस्थितीत घरापासून दूर राहणाऱ्या दोन तरुणांनी कोणतीही मेहनत न घेता फक्त दोन मिनिटांत पीठ मळण्याचा जुगाड दाखवला आहे. दोन तरुण सांगत आहेत की, रात्रीचे १२:४५ वाजले आहेत आणि त्यांना प्रचंड भूक लागली आहे.आम्हाला पोळ्या खायच्या आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कसं पीठ मळायचं याचा जुगाड सांगणार आहोत. तरुणांनी कोणता जुगाड व्हिडीओत सांगितला व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा… हेही वाचा…‘अनेक वर्षांनंतरही ती चव…’ विक्रेत्याकडे मिळणाऱ्या ‘त्या’ पेस्ट्री पाहून आठवतील लहानपणीचे दिवस; महिलेने सांगितली ‘ती’ गोष्ट; पाहा VIDEO व्हिडीओ नक्की बघा… https://www.instagram.com/reel/C52cv3yoVKn/?utm_source=ig_embed&ig_rid=9bc42959-8b8f-4657-85a3-764f72798e01 व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, पोळ्या करण्याआधी कणिक मळून घेण्याची प्रक्रिया आपल्यातील अनेकांना नकोशी वाटते. त्यासाठी आपण आईची मदत घेतो. पण, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणांकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे त्यांनी मिक्सरच्या भांड्यात कणिक मळून घेण्याचे ठरवले. तरुण एक मिक्सरचे भांडे घेतो. त्यात गव्हाचे पीठ, पाणी घालतो. बटण चालू करताच पीठ मिक्स होण्यास सुरुवात होते. ही प्रक्रिया ते पुन्हा एकदा करतात आणि पीठ मिक्सरच्या भांड्यातच मळून घेतात. पण, कणिक व्यवस्थित मळून झालं का हे मात्र व्हिडीओत दाखवण्यात आलेलं नाही. त्याआधीच व्हिडीओचा शेवट झाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ibalwantsingh_6 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे ; जे पाहून तुम्हालाही नक्कीच हसू येईल. 'मिक्सरमध्ये कणिक मळण्याची निन्जा टेक्निक' अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. तरुणांना हा जुगाड वाटलं असला तरीही ही कल्पना नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसत नाही आहे. तर काही जण 'जेव्हा पुरुष जेवण बनवतात तेव्हा असं चित्र बघायला मिळतं', 'त्यापेक्षा हाताने कणिक मळून झालं असतं', 'मिक्सर खराब करण्याची निन्जा टेक्निक आहे' आदी अनेक कमेंट व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.