Premium

iQOO ने लॉन्च केला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन; ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…, ऑफर्स एकदा पाहाच

iQOO च्या लॉन्च झालेल्या नवीन स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे.

iQOO Z7 Pro launched india with 4 mp ois camera
भारतात लॉन्च झाला iQOO Z7 Pro स्मार्टफोन (Image Credit- @IqooInd/twitter)

iQOO ही एक लोकप्रिय मोबाइल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स बाजारपेठेमध्ये लॉन्च करतच असते. त्यात ग्राहकांना नवीन फीचर्स आणि अपडेट्स मिळत असतात. iQOO कंपनीने भारतामध्ये आपला Z7 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोनप्रमाणेच हा फोन गेमर्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे. तसेच यात नवीन ड्युअल कॅमेरा सेटअप येतो. चला तर iQOO मग च्या Z7 Pro या नवीन स्मार्टफोनचे फीचर्स, बॅटरी, कॅमेरा आणि किंमतीबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO Z7 Pro हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी ७२०० ५जी च्या स्पोर्टसह येतो. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा Aura लाइट OIS कॅमेरा मिळणार आहे. तसेच १२० Hz AMOLED डिस्प्लेसह येणार हा फोन वजनाला खूप जाड नसून, हा फोन AG ग्लास फिनिशसह येतो. फोनमध्ये आऊट ऑफ बॉक्सिंग अँड्रॉइड १३ वर आधारित फनटच OS १३ देण्यात आला आहे. iQOO Z7 Pro मध्ये ३.० रॅम देण्यात आली आहे. जी वापरकर्त्यांना ८ जीबी व्हर्च्युअल रॅम ऑफर करते. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : iQOO ने लॉन्च केला आपला ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन; केवळ ८ मिनिटांमध्ये होणार…, ऑफर्स एकदा बघाच

या नवीन स्मार्टफोनमध्ये १.०७ अब्ज रंगाच्या सपोर्टसह ६.७८ इंचाचा AMOLED कर्व्ह डिस्प्ले मिळतो. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. तसेच सुरक्षेसाठी यात Schott Xensation UP ग्लास मिळणार आहे.

किंमत आणि उपलब्धता

नवीन iQOO Z7 Pro हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला असून, याचा पहिला सेल ५ सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. दुपारी १२ वाजता Amazon.in आणि iQOO.com वर हा सेल सुरू होणार आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रूपये आहे. तर २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे.

ऑफर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हा फोन SBI किंवा HDFC बँकेच्या कारधारकांना iQOO Z7 Pro या फोनवर २ हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तसेच तुम्ही तुमचा स्मार्टफोन एक्सचेंज केला तर कंपनी तुम्हाला २ हजारांचा एक्सचेंज बोनस देखील देणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iqoo z7 pro smartphone luanch india with 64 mp ois camera sale started 5 septmber tmb 01

First published on: 31-08-2023 at 17:06 IST
Next Story
एलॉन मस्क यांच्या ‘X’ वर लवकरच येणार ऑडिओ-व्हिडीओ कॉल फिचर: व्हॉट्सअ‍ॅपला आव्हान?