Spotify Planning Layoff: गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple व् Microsoft आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. एकापाठोपाठ मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Spotify कंपनीमध्ये कमर्चाऱ्यांची कपात अजून थांबलेली दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्ट १0 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार? सत्या नडेला यांचा ईमेल; म्हणाले, “हा काळ…”

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात स्पॉटिफाय कंपनीने त्यांच्या Gimlet Media आणि Parcast पॉडकास्ट स्टुडिओमधून सुमार ३८ कर्मचाऱ्यांची कपात केली होती. आता पुन्हा ही कंपनी पुन्हा एकदा आपला खर्च कमी करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याच्या विचारात आहे. Spotify ही एक म्युझिक कंपनी आहे.

हेही वाचा : बड्या ‘टेक’ कंपन्या इतकी घाऊक कर्मचारी कपात करतात, हे लक्षण कशाचं?

Spotify ने २०१९ च्या सुरुवातीला पॉडकास्टींगसाठी मोठ्या प्रमाणात तयारी दर्शवली होती. तसेच पॉडकास्ट नेटवर्क, सॉफ्टवेअर निर्मिती, होस्टिंग सेवा आणि लोकप्रिय शो चे अधिकार मिळवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. अहवालानुसार या कंपनीत ९,८०० कर्मचारी काम करतात. मात्र या वेळी किती कमर्चाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे हे अद्याप कंपनीकडून स्पष्ट झालेले नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spotify is preparing to lay off employees in its company soon in 2023 tmb 01