21 January 2018

News Flash

स्मार्ट रिव्ह्य़ू : आय बॉल अँडी ४.५ एच

सध्या भारतीय बाजारपेठेत एकाच वेळेस अनेक कंपन्यांनी स्मार्टफोन्सची अनेकविध मॉडेल्स दाखल केली आहेत. त्यामुळे बाजारपेठेची मोठीच तारांबळ उडाली आहे आणि ग्राहकांमध्ये गोंधळ. हा फोन घ्यावा

विनायक परब | Updated: January 29, 2013 12:16 PM

त्यामुळे लहानात लहान कंपनीनेही मोठा स्क्रीन असलेले स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत. त्यामुळे तर या गोंधळात अधिकच भर पडली आहे.. एरवी किंमत हा मुद्दा अतिशय प्रभावी असतो. म्हणून काही कंपन्यांनी किफायतशीर किंमतींचे स्मार्टफोन्स बाजारात आणले. आता त्याच दरामध्ये सर्वच कंपन्यांचे स्मार्टफोन्स स्पर्धा करताना पाहायला मिळतात.
दरम्यान, केवळ मोठय़ा स्क्रीनला भुलून चालणार नाही, याची जाणीवही आता ग्राहकांना चांगलीच झाली आहे. कारण मध्यंतरी अनेकांनी चिनी बनावटीचे मोठय़ा आकाराचे स्क्रीन असलेले स्वस्तातील फोन विकत घेतले आणि नंतर काही महिन्यांतच त्याचे फटके त्यांना सोसावे लागले. त्यामुळे किफायतशीर किंमत, कंपनीची विश्वासार्हता आणि एक उत्तम यंत्र असलेले उपकरण यावरच भारतीय बाजारपेठेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या पाश्र्वभूमीवर आता संगणक यंत्रणांच्या क्षेत्रातील प्रसिद्ध आयबॉल या कंपनीने अँडी ४.५ एच हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
स्क्रीन
खरे तर या स्मार्टफोनच्या स्क्रीनचा आकार त्याच्या नावामध्येच दडलेला आहे. त्याच्या नावातच ४.५ इंचाचा उल्लेख आहे. मोठा आकर्षक स्क्रीन हे चांगले वैशिष्टय़ आहे. केवळ एवढेच नाही तर हा आयपीएस क्यूएचडी क्षमता असलेला ९६० गुणिले ५४० रिझोल्युशन असलेला असा सुपर रिस्पॉन्सिव्ह कपॅसिटीव्ह टच असलेला स्क्रीन आहे. १२ हजार रुपयांच्या किंमतीच्या आसपास बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्समध्ये हा तसा सर्वोत्तम आकार व प्रकाराचा स्क्रीन मानायला हरकत नाही.
आयपीएस स्क्रीन
आयपीएस स्क्रीन याचाच अर्थ असा की, तुम्ही कोणत्याही कोनातून या स्क्रीनकडे पाहिलेत तरी तुम्हाला प्रतिमा व्यवस्थित पाहायला मिळते. टीव्हीच्या बाबतीत फ्लॅट स्क्रीनमध्ये अशा प्रकारचा अनुभव येतो. पूर्वीच्या टीव्हीमध्ये तिरके पाहिल्यास त्यातील प्रतिमा आपल्या विरूपीत झालेली दिसायची. मोबाईलसाठी आयपीएस स्क्रीन ही महत्त्वाची बाब आहे.
प्रोसेसर
यासाठी १ गिगाहर्टझ्चा कॉर्टेक्स ए९ डय़ुएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. आयबॉल अँडीमध्ये रॅमची क्षमताही चांगली आहे. यासाठी एक जीबी रॅमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे फोन हँग होत नाही. शिवाय त्याचा वेगही या रॅममुळे चांगला राखण्यात कंपनीला यश आहे.
ऑपरेटिंग सिस्टिम
अँडीसाठी आइस्क्रीम सँडवीच ही ४.०.४ ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली आहे. १२ हजार रुपयांच्या सर्व मोबाईलमध्ये आइस्क्रीम सँडवीच ही सिस्टिम पाहायला मिळते. कामाच्या संदर्भात ती पुरेशी वेगवान आणि सोयीची आहे. त्यापुढचे असलेली जेली बीन आवृत्ती ही अधिक महागडय़ा स्मार्टफोन्समध्ये वापरण्यात येते.
कॅमेरा
हल्ली स्मार्टफोन विकत घेताना पाहिली जाणारी महत्त्वाची बाब म्हणजे कॅमेरा. कारण बहुतांश जणांना स्वारस्य असते ते आपल्याला समोर जे घडताना दिसते आहे ते सर्वप्रथम आधी क्लिक्  करून, तेवढय़ाच वेगात सोशल नेटवर्किंगवर शेअर करण्यामध्ये. त्यामुळे त्यांना चांगल्या दर्जाचा कॅमेरा हवा असतो.
आयबॉल अँडीमध्ये मागच्या बाजूस ८ मेगापिक्सेलचा चांगला कॅमेरा आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याला फ्लॅशची सोयही कंपनीने दिली आहे. शिवाय यामध्ये ऑटोफोकसचीही सोय देण्यात आली आहे.
सोशल नेटवर्किंगची सोय
सोशल नेटवर्किंगवर शेअर करण्यासाठी किंवा लगेचच फ्लिकर किंवा फोटो साठवणूक करणाऱ्या इतर सॉफ्टवेअर अकाऊंटस्साठीही यात कॅमेऱ्यावर क्लिक् केल्यानंतर फोटोच्या एका बाजूला सोय करून देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही टिपलेला फोटो तेवढय़ाच वेगात तुम्हाला शेअर करण्याचीही सोय आहे.
ऑटोफोकसची सोय
या कॅमेऱ्यावर आऊटडोअर फोटोग्राफी चांगल्या पद्धतीने करता येते. आऊटडोअरचे फोटो चांगले येतात तर घरामध्ये ऑटोफोकसवर टिपलेले फोटो तेवढे चांगले येत नाहीत. मात्र हेच फोटो टिपताना फ्लॅशचा वापर केला तर मात्र येणारे फोटो चांगले येतात, असे रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आले. अनेकदा चित्रणादरम्यान ऑटो फोकसचा वापर चांगल्या पद्धतीने होतो.
पॅनोरमा मोड
पॅनोरमा मोडमध्ये काढलेले फोटोही चांगले येतात. अलीकडे खूप मोठय़ा प्रमाणावर वेगळ्या प्रकारच्या फोटोंसाठीहा मोड वापरला जातो.
समोरच्या बाजूस व्हिडिओ कॉलिंगसाठी अर्थात थ्रीजी कॉलिंगसाठी ०.३ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
इंटर्नल मेमरी
या स्मार्टफोनला ४ जीबीची स्वतची इंटर्नल मेमरी असून ती मायक्रो मेमरी कार्डाच्या माध्यमातून ३२ जीबी अतिरिक्त वाढविताही येते. हा स्मार्टफोन सडपातळ अर्थात ९.९ मिमी. एवढय़ा जाडीचा आहे. शिवाय दिसायलाही तो आकर्षक आहे.
कनेक्टिविटी
अँडी हा स्मार्टफोन थ्रीजी प्रकारात मोडणारा आहे.
थ्रीजी एचएसयूपीए ५.७६ मेगाबाईटस् प्रतिसेकंद एचएसडीपीए ७.२ मेगाबाईटस् प्रतिसेकंद वेगाने (२१०० मेगाहर्टझ्)
याशिवाय एज, जीपीआरएस, क्वाड बॅण्ड ८५०/ ९००/ १८००/ १९०० मेगाहर्टझ्
वाय- फाय ८०२.११ बी/जी
ब्लूटूथ ए२डीपी
बॅटरी क्षमता
आयबॉलसोबत १६०० एमपीएच ही बॅटरी देण्यात आली आहे. अनेकदा ही बॅटरी वेगात खाली येत असल्याचे रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आले.
प्री- लोडेड अ‍ॅप्स
व्हॉटस्अ‍ॅप पासून ते अगदी फेसबुक, अँग्री बर्डस् ट्विटर, लिंक्डइन आदी बाबी प्री- लोडेड स्वरूपात इथे उपलब्ध आहेत.
ऑडिओ व व्हिडिओ
या स्मार्टफोनची ऑडिओ आणि व्हिडिओ गुणवत्ता दोन्ही चांगल्या प्रकारात मोडणारी आहे. रेडिओचा वापर स्पीकर्सच्या मार्फत करायचा झाला तर कदाचित त्याचा आवाज इतर स्मार्टफोन्सच्या तुलनेत कदाचित कमी भासावा, असा आहे. तर एफएम रेडिओ ऐकताना काही वेळेस मध्येच त्याचा आवाज बारिक होता.
 रिव्ह्य़ू दरम्यान वेगवेगळ्या वेळेस हा वापरून पाहिला असता या बाबीला काही मिनिटांनी सातत्याने पुन्हा पुन्हा सामोरे जावे लागते, असे लक्षात      आले.
भारतीय बाजारपेठेतील किंमत  : १२,४९०/-

First Published on January 29, 2013 12:16 pm

Web Title: iball andi 4 5 h
  1. No Comments.