का नातले अर्थात कर्णभूषणे हा स्त्रीच्या साजशृंगारातील महत्त्वाचा घटक. सणासुदीचे नटणेथटणे सोडाच, पण रोज ऑफिसला जाताना किंवा घरात असतानाही आपली कर्णभूषणे वेशभूशेला मिळतीजुळती असावीत, याकडे महिलावर्गाचा विशेष कटाक्ष असतो. त्यामुळे रेल्वेमध्ये येणाऱ्या विक्रेत्यांपासून बाजारातील मोठमोठय़ा दुकानांपर्यंतच्या सर्वच ठिकाणच्या कानातल्यांकडे त्यांचे बारीक लक्ष असते. अगदी नामांकित मॉडेल किंवा अभिनेत्रींच्याही वेशभूशेत कर्णालंकाराला विशेष महत्त्व दिले जाते. आता तर प्रत्येक नव्या साडी किंवा ड्रेसवर मॅचिंग कर्णभूषणे खरेदी केले जात आहेत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या कानातल्यांमध्ये बऱ्याच डिझाइन्स आल्या आहेत. या डिझाइन्स बघता क्षणी आपल्याकडे कोणकोणत्या रंगांचे ड्रेस आहेत, कोणत्या साडीवर कोणते कानातले चांगले दिसतील, हे विचार तरुणींच्या मनात सुरू होतात. कित्येकदा त्या रंगाचा ड्रेसही नसतो तरीही कानातले आवडले म्हणून घेतले जातात. त्यावर शोभणारे मोराच्या पिसासारखे, गोलाकार, चौकोनी तसेच डायमंड आणि यासारखे अनेक प्रकार बाजारात आले आहेत. अनारकली स्टाइलमध्ये किंवा भरलेला ड्रेस असेल तर त्यावर मोठे आणि डिझायनर कानातले घातले जातात. सध्या झुमका प्रकारातल्यांची जास्त चलती आहे. निऑन रंगाच्या कानातल्यांना जास्त मागणी आहे. काही हिंदी चित्रपटांमुळे झुमके अधिक प्रसिद्ध झाल्याचे विक्रेते सांगतात. सध्या वेगवेगळ्या झुमक्यांचे बाजारात आकर्षक कलेक्शन उपलब्ध आहे. मोतीमिश्रत, कॉपर, कुंदनचे असे असंख्य प्रकारात झुमके बाजारात पाहायला मिळतात.
कान : ‘कान’ हा कर्णभूषणाचा हा एक भन्नाट प्रकार आहे असे म्हणायला हरकत नाही. पूर्ण कान या कानाच्या दागिन्यांमुळे सुंदर नटलेला दिसेल. ज्यांना कानाच्या वरच्या बाजूलासुद्धा कानातले घालायला आवडतात. पण टोचायला भीती वाटत असेल तर त्यांच्यासाठीदेखील हे कानातले उत्तम पर्याय ठरू शकतात. यामध्ये फक्त सोनेरी रंगांचा पट्टापण असतो किंवा कुंदन स्टाइलमध्येसुद्धा ते उपलब्ध आहेत. या प्रकाराच्या कानातल्यांमध्ये कानातले एका सुंदर नक्षीकामाने तयार केलेले असते. सध्या ज्या ड्रेसच्या प्रकारची चलती आहे, त्यावर हे कानातले अगदी शोभून दिसतात. नऊवारी साडीवर घातले तरीही पारंपरिक, पण मॉडर्न असा आगळावेगळा लुक येतो.
मोत्याचे कर्णालंकार : सध्या कानातल्यांचे जितके प्रकार आले आहेत त्यातील निम्म्याहून जास्त मोत्यांचे आहेत. मोती हा प्रकार सगळ्यावरच शोभून दिसतो. मोत्यांचे दागिने न आवडणारी मंडळीसुद्धा या कानातल्यांची खरेदी करू लागले आहेत. अगदी राईच्या आकाराचे किंवा त्याहून थोडे मोठे मोती या कानातल्यांमध्ये अशा प्रकारे बसवले जातात की हे कानातले घातल्यावर चेहरा नक्कीच खुलून दिसेल.
कोयरी आणि मोर : यापूर्वी कोयऱ्यांच्या आकारांच्या असंख्य डिझाइन्स बाजारात आल्या असतील. पण, सध्या बाजारात आलेल्या कोयऱ्यांच्या प्रकारांनी तरुणींना मोहिनीच घातली आहे. मोराचे डिझाइनसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. मोती, डायमंड, कुंदन अशा प्रकारात हे कानातले उपलब्ध आहेत.
भरीव रिंगा : रिंगा म्हटल्या की, एक छोट किंवा मोठ गोल वर्तुळ असेच आपले मत होते. सध्या बाजारात ज्या रिंगाची चलती आहे, त्या रिंगाना बघितल्यावर कदाचित तुमचं मत बदलेल. या रिंगावर अप्रतिम कलाकुसर करण्यात आली आहे. तुम्हाला प्राचीन राण्यांच्या दागिन्यांची नक्कीच आठवण करून देतील. तसेच या रिंगा दिसायला भरगच्च दिसत असल्या तरी त्या तितक्या जड नाही आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold hear rings
Show comments