ठाणे : ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

हेही वाचा… ठाणे जिल्ह्यातील ९३६ शाळा तंबाखूमुक्त

ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीनंतर आहेर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.