ठाणे : जेवण गरम करून दिले नाही म्हणून एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर बसण्याचा लाकडी पाट मारून गंभीर जखमी केले. भिवंडी येथील खाडीपार भागात हा प्रकार उघडकीस आला. महिलेच्या डोक्याला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

हेही वाचा – मीरा भाईंदरमधील भाजप-शिवसेना वाद शिगेला

हेही वाचा – मुलाच्या ‘कल्याणा’साठी मुख्यमंत्र्यांचे सारे काही

खाडीपार येथील शकील खान चाळीमध्ये ४७ वर्षीय महिला तिचे पती आणि मुलासोबत राहाते. तिचा पती किरकोळ कारणांवरून तिला मारहाण करत असतो. शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास तिचा पती घरी आला. त्याला जेवण गरम मिळाले नाही. त्यामुळे त्याने तिच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर लाकडी पाटाने मारहाण केली. या मारहाणीत तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. त्यानंतर तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या जबड्याचा अस्थिभंग झाला आहे. तर, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या शुद्धीवर आल्या नव्हत्या. याप्रकरणी महिलेच्या भावाने शनिवारी निजामपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.