डोंबिवली – अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी स्फोट झाल्यापासून बेपत्ता असलेल्या राकेश ब्रम्हदिन राजपूत (४०) या कामगाराचा मृत्यदेह शनिवारी सुरू असलेल्या बचाव कार्याच्यावेळी मिळून आला. राकेश राजपूत अमुदान केमिकल कंपनी लगतच्.या सप्तवर्ण कंपनीत नोकरीला होता. दरम्यान या स्फोटातील एकूण मृतांचा आकडा १६ वर गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्फोट झाल्यापासून राकेश बेपत्ता होता. त्याचे कुटुंबीय त्याचा रुग्णालय, स्फोट झाल्या परिसरात शोध घेत होते. रुग्णालयातील जखमी, मृतदेहांमध्येही राकेशचा मृतदेह आढळून येत नसल्याने त्याचे कुटुंबीय शोकाकुल होते. गुरुवारी सकाळी राकेश कामावर गेला होता. स्फोटानंतर त्यांचा मोबाईल बंद येत होता. त्याचा कोणताही ठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीय अस्वस्थ होते. बचाव कार्याच्या ठिकाणी हाताचा पंजा आणि बोटे दिसली. तो मृतदेह राकेशचा असल्याची खात्री पटल्यावर कुटुंबीयांनी टाहो फोडला. त्याचा मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

हेही वाचा >>>ठाणे : गायमुख ते वसई दरम्यान वाहतुक कोंडी; १० ते १५ मिनिटांच्या अंतरासाठी सुमारे पाऊण तास

मृत संंख्या वाढण्याची शक्यता अमुदान स्फोटात एकूण १३ कामगारांचे मृतदेह हाती लागले आहेत. दोन कामगारांचे अवशेष शुक्रवारी,सापडले. शनिवारी सप्तवर्ण कंपनीमधील एक कामगाराचा मृतदेह सापडल्याने आता स्फोटातील मृतांची संख्या सोळावर गेली आहे. बेपत्ता नऊ कामगारांचा शोध सुरू आहे. सात मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. ती ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांच्या डीएनए चाचणीच्या प्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ओळख पटल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांंच्या ताब्यात दिले जात आहेत, असे पोलिसांनी सांगितले