Premium

आजोबांचा डिस्को डान्स पाहिला का? अतरंगी डान्स स्टेप्स अन् भन्नाट हावभाव; व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या डिस्को डान्स करणाऱ्या एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्स आठवू शकतो.

a old man disco dance video
आजोबांचा डिस्को डान्स पाहिला का? अतरंगी डान्स स्टेप्स अन् भन्नाट हावभाव; व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्स व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला येते तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या डिस्को डान्स करणाऱ्या एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्स आठवू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबा रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. सुरुवातीला त्यांच्या अतरंगी डान्स स्टेप्स पाहून कळत नाही की ते कोणता डान्स करत आहेत पण नंतर समजते की ते डिस्को डान्स करत आहे.
त्यांच्या भन्नाट डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. उतार वयात इतका सुंदर डिस्को डान्स करणाऱ्या आजोबांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ जुना असून पुन्हा चर्चेत आला आहे.

हेही वाचा : काकूने घेतला भन्नाट उखाणा; म्हणाल्या, “इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर…” व्हिडीओ एकदा पाहाच

laperarecords या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देत आजोबांच्या डान्सचे कौतुक केले आहे. काही युजर्सना त्यांच्या डान्स स्टेप्स खूप आवडल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A old man disco dance video goes viral watch dance steps and facial expressions ndj

First published on: 23-09-2023 at 12:19 IST
Next Story
मुलगा लपून गुपचूप पित होता दारू, पण तेवढ्यात वडिलांनी पकडलं, VIDEO पाहून नेटकरी म्हणतात..”महागात पडलं!”